शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

ओव्हरलोड वाहने गावकऱ्यांनी अडविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 11:33 PM

रस्त्याची क्षमता नसतानाही दररोज ओव्हरलोड वाहने चालवून रस्त्याची दैनावस्था करण्यात आली आहे. यामुळे त्रस्त होऊन पाळसगाव येथील गावकऱ्यांनी शनिवारी नंदोरी-पळसगाव मार्गावरून जाणारी सर्व ओव्हरलोड वाहने अडवून धरली.

ठळक मुद्देरस्त्याची दैनावस्था : टोल वाचविण्यासाठी सुरू आहे प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : रस्त्याची क्षमता नसतानाही दररोज ओव्हरलोड वाहने चालवून रस्त्याची दैनावस्था करण्यात आली आहे. यामुळे त्रस्त होऊन पाळसगाव येथील गावकऱ्यांनी शनिवारी नंदोरी-पळसगाव मार्गावरून जाणारी सर्व ओव्हरलोड वाहने अडवून धरली.माजरीवरून तीन कि.मी. अंतरावरील पळसगाव येथून नंदोरी- विसलोन मार्गे ओव्हरलोड दहा चाकी हायवा ट्रक, टिप्परची माती व मुरूम घेऊन अनधिकृतरित्या वाहतूक सुरू आहे. हा मार्ग जडवाहनांसाठी नसून नंदोरी व वरोरा येथील टोलनाका वाचविण्यासाठी या मार्गाने वाहतूक केली जात आहे. पळसगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी या वाहतुकीला वारंवार विरोध केला. तरीही ही वाहतूक सुरूच आहे. वणी -वरोरा मार्गावर काम करणाऱ्या कंत्राटदाराने मागील दोन महिन्यांपासून आपली मुजोरी कायम ठेवली आहे. यामुळे नंदोरी-विसलोन-पळसगाव या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता वेकोलि माजरीच्या सीएसआर निधी अंतर्गत तयार करण्यात आला आहे. सध्या या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, हा रस्ता वेकोलिने बांधला असल्याने बांधकाम विभागानेही या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सामाजिक कार्यकर्ता जीवन रोडे यांनी वेकोलि व बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिली आहेत. सध्या सर्वत्र रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे. मात्र हा रस्त्याची दैनावस्था कायमच आहे. पळसगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत एक ठराव घेऊन पळसगाव मार्गावरून जड वाहतूक बंद केली आहे. असे असतानाही येथून जडवाहतूक सुरूच आहे. त्यामुळे त्रस्त होऊन शनिवारी ग्रा.पं.पदाधिकारी व गावकऱ्यांनी सर्व जडवाहने अडवून धरली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप झाडे, अरूण जोगी, प्रकाश निब्रट, महेश निब्रट, गिरीधर धवस, संतोष कोडापे व गावकरी उपस्थित होते.