शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

राजुरात ऑक्सिजन प्लांट लवकरच उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 4:22 AM

राजुरा : कोरोनाची दुसरी लाट जीवघेणी ठरली असून या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आरोग्य व्यवस्था अपुरी ...

राजुरा : कोरोनाची दुसरी लाट जीवघेणी ठरली असून या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात सर्वाधिक कमतरता जाणवत आहे ती म्हणजे रेमडेसिविर लस आणि ऑक्सिजनची. या पार्श्वभूमीवर राजुरा नगर परिषदेने तत्परतेने पावले उचलली असून शहरात ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेत जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी दिली.

सध्या रुग्णांच्या श्वसनसंस्थेवर परिणाम होत असून बऱ्याच रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा व कित्येकदा व्हेंटिलेटरची सुद्धा निकड भासत आहे.

सध्या देशभरात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असून राज्य तसेच जिल्ह्यातही ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना प्राण गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राजुरा नगर परिषदेने ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर केला आहे.

प्रस्तावाची माहिती देताना नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले की, शहरात कोरोना रुग्णांच्या उपचार व देखभालीसाठी मिळून जवळपास १५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन खाटांची व्यवस्था आहे. भविष्यात आवश्यकतेनुसार यात वाढ करण्याची गरज पडल्यास रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून राजुरा नगर पालिकेने जिल्हाधिकारी यांच्याकडे ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. जवळपास १ कोटी १९ लाख ८० हजार ६५८ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सदर खर्चाला तसेच ऑक्सिजन प्लांट उभारणीस मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव देण्यात आला असून लवकरात लवकर सदर प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ चे कलम ९३(८) अन्वये विना निविदा या प्रकल्पास मान्यता व मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे.