लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाने यंदाही बळीराजाची परीक्षाच घेण्याचे ठरविले आहे की काय, असे दिसते. पावसाळ्याचे दोन महिने लोटले. मात्र जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. सर्वांच्या अंदाजांना ठेंगा दाखवित पाऊस दडी मारून बसला आहे. दुसरीकडे पावसाच्या या दडीमुळे शेतकºयांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. जवळजवळ सर्वच शेतकºयांना आता पावसाची गरज आहे. मात्र पाऊस येतच नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.बहुप्रतीक्षेनंतर मागील आठवड्यापूर्वी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसला. आता काही दिवस पाऊस सक्रिय राहील, अशी आशा शेतकºयांना होती. हवामान खात्याचाही तसाच अंदाज होता. मात्र पुन्हा सर्व अंदाज चुकवत पावसाने दडी मारली. पाऊस अचानक गायब झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. पावसाळ्यात जुलै महिना सर्वाधिक पावसाचा महिना मानला जातो. या महिन्यात संपूर्ण जलसाठ्या बºयापैकी पाणी जमा होते. मात्र यावेळी संपूर्ण जुलै महिना कोरडा जात आहे. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. परंतु या देशातील शेतीच आज बिनभरवशाची झाली आहे. पावसाअभावी शेतीला अवकळा आली आहे. सरकार शेतकºयांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग शेतकºयांना साथ देत नाही. जगाच्या पोशिंद्यावर आज आलेले संकट फार मोठे आहे. शेतकºयांनी जगावे की मरावे एवढी शेतकºयाची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकºयांवर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल या एकाच भरवशावर शेतकºयांनी उसनवारी व कर्ज काढून कशीबशी शेती केली. हवामान खात्यानेही यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. थेट हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरवित यावेळी पावसाने दगा दिला. पावसाअभावी शेतकºयांनी पेरणी केलेले महागडे बियाणे मातीमोल झाले. शेतकºयांनी दुबार-तिबार पेरणी केली. परंतु अपुºया पावसाने पेरणी केलेले बियाणे मातीतच सडून गेले. त्याचा चांगलाच फटका शेतकºयांना बसला आहे.जुलै महिन्यात विदर्भात पुन्हा पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या. अंदाजाप्रमाणे पावसाने दमदार पुनरागमन केले. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पाऊस बरसला. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच शेतकºयांनी आपल्या पेरण्या आटोपल्या.मात्र त्यानंतर पावसाने दगा दिला. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही निसर्गाच्या पाण्यावर कोरडवाहू शेती करतात. रोवणीनंतर पिकांना पुन्हा पावसाची गरज आहे. मात्र पाऊस कुठे लपून बसला कळायला मार्ग नाही. जुन, नंतर जुलै महिनादेखील शेतकºयांच्या दृष्टीने निराशाजनकच राहिला. पावसाच्या महिन्यातच पाऊस बरसला नाही. आता केवळ पावसाचा आॅगस्ट महिनाच शिल्लक आहे. या महिन्यातही पावसाने आपली दडी कायम ठेवली तर शेतकºयांची अवस्था तर बिकट होईलच; सोबतच संपूर्ण जिल्ह्यातच परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.पाणीटंचाईचा धोकायंदा जून महिन्यातील पावसाचे आगमन दमदार झाले नाही. पावसाची एन्ट्रीच शेतकºयांसाठी सुखावह ठरू शकली नाही. जुलै महिन्यात तरी पाऊस सर्व उणिवा भरून काढेल, अशी आशा होती. मात्र चार दिवसांचा अपवाद वगळता जुलै महिनाही कोरडाच गेला. जिल्ह्यातील अकराही सिंचन प्रकल्पात अजूनही पाण्याची बोंब आहे. नदी, नाले, बोड्या, तलाव यासारखे ग्रामीण जलस्रोत निम्मेही भरू शकले नाही. आता आॅगस्ट महिन्यात तरी दमदार पाऊस पडला नाही तर पुढे उन्हाळ्यासारखा पाण्याचा ज्वलंत प्रश्न हिवाळ्यात उद्भवू शकतो, हे निश्चित.
पावसाने वाढविली शेतकºयांची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 11:26 PM
पावसाने यंदाही बळीराजाची परीक्षाच घेण्याचे ठरविले आहे की काय, असे दिसते. पावसाळ्याचे दोन महिने लोटले.
ठळक मुद्देपुन्हा मारली दडी : जुलै महिनाही निराशाजनक; शेतकºयांनी करावे काय ?