कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ३५० पेक्षा जास्त केंद्र तयार केले. चंद्रपूर महानगरपालिका व जिल्ह्यातील ७० पेक्षा जास्त केंद्र आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांनाही प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्र बंद राहतात. प्रत्येक केंद्राला १०० ते ८० डोस मिळत आहेत. त्यामुळे ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना लस मिळणे कठीण झाले. आरोग्य विभागाकडून लस मिळाल्यानंतर सकाळी दहा वाजता लसीकरणाला सुरुवात होते. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी चंद्रपूर मनपाने कूपन पद्धत सुरू केली. केंद्रात जेवढे डोस आले तेवढेच कूपन आधी वितरण केले जाते. नागरिक पहिल्यांदा कूपनसाठी रांगा लावतात. बऱ्याचदा केंद्रात लस किती उपलब्ध आहे, हे आरोग्य पथकाकडून सांगितले जात नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
लसीकरणाची गती मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:20 AM