निळकंठ नैताम।लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : वातावरणातील बदलामुळे धान पिकावर विविध रोगांनी आक्रमण केले होते. त्यावर विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करून रोग नियंत्रणात आणण्यास शेतकऱ्यांना यश प्राप्त झाले. परंतु आता मावा तुडतुडा या भयानक रोगाने उभ्या पिकांवर हल्ला केल्याने धान पिकांचे तणसात रूपांतरण होणे सुरू झाले असून सदर रोग नियंत्रणात आणने कठीण झाले आहे. पावसाने गेल्या २५ ते ३० दिवसाप्ाांसून दडी मारल्याने पाण्याअभावी धानपीक सुकायला लागल्याने शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.पोंभुर्णा तालुका परिसरामध्ये खरीप, हंगामाच्या सुरूवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकºयांनी नव्या उमेदीने यावर्षी तरी चांगले उत्पादन होणार म्हणून अपार मेहनत करून धान पिकांची लागवड केली. रोवणी झाल्यानंतर पाऊस बºयापैकी आल्याने पिकांची चांगली वाढसुद्धा झाली. मध्यंतरी उन्हाची दाहकता वाढली आणि वातावरणामध्ये बदल झाला. त्यामुळे करपा, गेरू, पांढरा, रोग अशा विविध रोगांनी धानपिकांवर आक्रमण केले. तेव्हा विविध प्रकारची फवारणी करून शेतकºयांनी सदर रोग नियंत्रणात आणले. त्यामुळे शेतकºयांच्या आशा वाढल्या. यावर्षी बºया प्रमाणात उत्पादन होणार, असे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या शेतकºयांना मात्र पुन्हा मोठा धक्का बसला. धानपीक गर्भाशयातून बाहेर पडून लोंबे तयार होत असतानाच मावा तुडतुडा या रोगाने हल्ला केल्याने हिरवे धानपिक काळसर पडून त्याचे तणसात रूपांतर होणे सुरू झाले आहे. विविध औषधांची फवारणी करूनसुद्धा रोग नियंत्रणात आणणे कठीण झाले असल्याने धान उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. गेल्या २५ ते ३० दिवसांपासून पावसाने सुद्धा दडी मारल्याने ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे ते इंजिन व मोटारपंपाने पाणी करून आपले ेधानपिक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही, ते मात्र वरूण राजाकडे आकाशाला गवसणी घालून पाणी पाडण्याची विनंती करीत आहेत. एकूणच मावा तुडतुडा रोग नियंत्रणात न आल्यास धान उत्पादनावर फार मोठा परिणाम होणार आहे.मजुरांचे भाव वधारलेदरवर्षी फवारणीसाठी मजुरांना अर्ध्या दिवसाचे २०० रूपये तर पूर्ण दिवसाचे ३०० रूपये असा दर होता. परंतु यावर्षी अर्ध्या दिवसाचे ३५० तर पूर्ण दिवसाचे ५५० रूपये द्यावे लागत असल्याने उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नसल्याने शेतकरी तुर्तास हतबल झाला आहे.कृषी विभागाचे मार्गदर्शन नाहीकोणत्या रोगांवर नेमकी कोणती औषधी फवारावी, शेतकºयांच्या शेतामध्ये नेमका कोणता रोग लागलेला आहे, याची प्रत्यक्षात खात्री करून त्यांना कृषी अधिकाºयांंकडून मार्गदर्शन केले जात नसल्याने खासगी कृषी केंद्र चालकांनी दिलेल्या औषधांची फवारणी करणे सुरू आहे.
पावसाअभावी धान पीक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:37 PM
वातावरणातील बदलामुळे धान पिकावर विविध रोगांनी आक्रमण केले होते. त्यावर विविध प्रकारच्या औषधांची फवारणी करून रोग नियंत्रणात आणण्यास शेतकऱ्यांना यश प्राप्त झाले. परंतु आता मावा तुडतुडा या भयानक रोगाने उभ्या पिकांवर हल्ला केल्याने धान पिकांचे तणसात रूपांतरण होणे सुरू झाले असून सदर रोग नियंत्रणात आणने कठीण झाले आहे.
ठळक मुद्देमावा तुडतुडा रोगाचे आक्रमण : भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता