लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धान उत्पादक म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. हाती आलेला घास गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये या पावसामुळे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी किडीच्या प्रादूर्भावामुळे शिल्लक असलेले पीक वाचविण्याचा शेतकऱ्यांचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे. आर्थिक जुळवाजुळव करून शेती फुलविली. मात्र आता घेतलेले कर्ज कसे फेडायचे, अशी चिंता सध्या शेतकºयांना सतावत आहे.पळसगाव परिसरात चिंता वाढलीलोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव : बल्लारपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी कपाशीसोबतच सोयाबीन व धान पिकांची लागवड केली. लागवड करण्यासाठी पैशाची जुडवाजुडव केली. बँक व सोसायटी मार्फत कर्ज काढले. मात्र परतीच्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. या पावसामुळे सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहे.कापलेले पीक पाण्यात भिजल्यामुळे त्याला कोंब आले. त्यामुळे वर्षभराचे आर्थिक चक्र बिघडले आहे. त्यामुळे पुढील दिवस कसे काढायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.एका बॅगसाठी अडीच ते तीन हजार रुपये मोजून शेतकऱ्यांनी बियाणे घेतले. आज सोयाबीन कापणीला देखील प्रती बॅग दोन ते अडीच हजार रुपये मजुराला द्यावे लागत आहे. कापलेले सोयाबीनच पाण्यात भिजल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.आजवरी झालेल्या खर्चाची देखील परतफेड होणार की, नाही याची चिंता त्यांना पडली आहे.जिल्ह्यातील धान उत्पादक तालुकेजिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, पोंभूर्णा, गोंडपिपरी, नागभीड, सावली, चिमूर, बल्लारपूर तसेच चंद्रपूर आणि राजूरा तालुक्यातील काही शेतकरी मोठ्या प्रमाणात धान उत्पादन घेतात. विशेष म्हणजे, भद्रावती आणि इतरही तालुक्यातील काही शेतकरी धानाचे उत्पादन घेतात.जिल्ह्यातील कोरपना, राजुरा,वरोरा, भद्रावती, चंद्रपूर तसेच जिवती तालुक्यात काही भागामध्ये सोयाबीन तसेच कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
अस्थिर वातावरणामुळे धान उत्पादक रडकुंडीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 5:00 AM
एका बॅगसाठी अडीच ते तीन हजार रुपये मोजून शेतकऱ्यांनी बियाणे घेतले. आज सोयाबीन कापणीला देखील प्रती बॅग दोन ते अडीच हजार रुपये मजुराला द्यावे लागत आहे. कापलेले सोयाबीनच पाण्यात भिजल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.आजवरी झालेल्या खर्चाची देखील परतफेड होणार की, नाही याची चिंता त्यांना पडली आहे.
ठळक मुद्देपरतीच्या पावसाने केला घात, विविध रोगांचा प्रादूर्भावशेतात पाणी साचल्यामुळे कापणी करून ठेवलेले धान काढण्याचा प्रश्नशेतकऱ्यांनी हंगामात रंगविलेल्या स्वप्नाचा पुन्हा झाला चुराडा