लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : धानाचे आगार म्हणून ओळखल्या जाणारा सिंदेवाही, नवरगाव, मोहाळी (नलेश्वर) हा परिसर यंदा मात्र नापिकीने व धानावरील रोगराईमुळे त्रस्त झाला आहे. लहरी निसर्गावर अवलंबून असलेल्या धान उत्पादकांना यंदा जबर फटका बसल्याने तालुक्यातील शेतकरी मात्र आर्थिक कोंडीत सापडले आहेत.सिंदेवाही तालुक्यात खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे पीक घेतले जाते. खेड्यापाड्यातही लहान स्वरुपाच्या तलाव-बोड्या असल्यामुळे शेतकºयांचा धान पीक घेण्याकडे अधिक कल असतो. परंतु यावर्षी मात्र निसर्गाची वक्रदृष्टी आणि शासनाच्या दिशाहीन कृषी धोरणामुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे. उत्पादन खर्चाची अवाढव्य वाढ आणि मातीमोल भाव या कारणामुळे शेतकरी कर्जाच्या बोजात सापडला आहे.तालुक्यात मागील पाच वर्षांपासून धान उत्पादनात घट होत आहे. अधिक उत्पादन घेणाºया शेतकºयांना हमखास पिकणाºया धान शेतीचे भवितव्य किडीमुळे अंधकारमय वाटू लागले आहे. खरीप हंगामात यावर्षी धानावर मावा, तुडतुडा, कडा करपा, मानमोडी, लाल्या या रोगाचा फार मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. शेतकºयांनी तीन-चार वेळा किटकनाशकाची हजारो रुपये खर्च करून फवारणी केली. मात्र काहीच फायदा झाला नाही.खरीप हंगामात यावर्षी एकरी सात क्विंटल धानाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. दरवर्षी होत असलेल्या उत्पादनाच्या घटीमुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. उत्पन्नातही घट आणि धानालाही भाव नाही, अशा दुहेरी कचाट्यात धान शेतकरी सापडले आहेत. व्यापारी स्थानिक पातळीवर कोणत्याही धानाच्या भावात वाढ करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या औषधाची दोन-तिनदा फवारणी करून सुद्धा औषधाचा फायदा झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.वाढत्या महागाईमुळे आपल्या कुटुंबाचा पालन पोषण व मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा, असा मोठा यक्षप्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. त्याचवेळी दुष्काळ स्थितीचा अंदाज घेताना प्रचलीत आणेवारीचा काहीही उपयोग होत नाही. परिणामी शेतकºयांना पीक कर्जाचा काहीच फायदा मिळत नाही. कमी भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने मदत करावी.धानाचे पंचनामे करण्याचे आदेशनागभीड : धान पिकावर मावा, तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव आहे आणि यात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे, हे एकदाचे प्रशासनाने मान्य केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी पिकाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत .चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त धानाचे पीक नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुक्यात घेतले जाते. या तालुक्यात अगोदर पावसाने इंगा दाखवला. या संकटावर मात करून शेतकºयांनी धान पीक जोपासले. आता हे पीक अंतिम टप्प्यात म्हणजे कापणीला आले असताना या धान पिकावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. यात मावा तुडतुड्यासह करपा, लाल्या व अन्य रोगांचाही समावेश आहे. विविध रोगांच्या आक्रमणाने शेतकरी वर्ग पार हतबल झाले आहेत. हे पीक वाचविण्यासाठी शेतकºयांनी अनेक प्रयत्न केले. दोनदा तिनदा फवारणी केली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या फवारणीवर हजारो रुपये शेतकºयांनी खर्च केले असले तरी हा सर्व खर्च पाण्यात गेल्याने शेतकरी पार हबकून गेला आहे.दरम्यान माध्यमांनी शेतकºयांची ही अवस्था समोर आणल्याने प्रशासनास जाग आली आणि धानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी यात अडचण येण्याची शक्यता आहे. यात आतापर्यत शेतकºयांची बहुतांश धान कापणी पार पडली आहे. कापणी झालेल्या धानाचा पंचनामाही अधिकाºयांनी करावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.उत्पादन घ्यावे कसेतळोधी (बा) : गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला असताना यावर्षी सुद्धा निसर्गाच्या लहरीपणामुळे व ऐन हातात येत असलेले धान पीक विविध रोगाने नष्ट झाले आहे. धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकºयांना एकरी २ पोते धानाचे उत्पादन होत असल्यामुळे शेतकºयांसमोर जीवन जगावे तरी कसे, असा प्रश्न शेतकºयांना पडत आहे.
धान उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 11:24 PM
धानाचे आगार म्हणून ओळखल्या जाणारा सिंदेवाही, नवरगाव, मोहाळी (नलेश्वर) हा परिसर यंदा मात्र नापिकीने व धानावरील रोगराईमुळे त्रस्त झाला आहे.
ठळक मुद्देउत्पादनात घट : फवारणी करूनही पीक हातून गेले