चंद्रपूर : अनिल मोतीलाल फाउंडेशनतर्फे बल्लारपूर येथे विदर्भस्तरीय ओपन ३ किमी मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत विदर्भातील जवळपास अडीचशे मुलींनी सहभाग घेतला होता. त्या सर्वांवर मात करीत पडोली येथील लावण्या नागरकर हिने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकविला. पडोली येथील दर्शन मासिरकर हा परिसरातील ४० जणांना धावण्याचे प्रशिक्षण देत असून त्याचा सराव घेत आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात लावण्याने हे यश संपादन केले. तिने आपल्या यशाचे श्रेय विजय भगत, प्रकाश नागरकर, मकरंद खाडे यांना दिले आहे. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी पडोलीच्या लावण्या नागरकर यश संपादन करून ग्रामीण भागातील खेळाडूंची जागतिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची आशा पल्लवित केली आहे. परंतु, ग्रामीण भागातील विविध खेळांत प्रावीण्य असलेल्या खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम लोकप्रतिनिधींनी करणे गरजेचे आहे.
पडोलीची लावण्या मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:29 AM