ठळक मुद्देकारण गुलदस्त्यात
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: घुग्घुस पंचायत समिती सदस्य शालू विवेक शिंदे यांनी आज मंगळवार सकाळी १० च्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. त्या मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूरला पाठवण्यात आला आहे. त्यांचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय होता.