ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील ३२ गावांचा समावेश चिमूर विधानसभा क्षेत्रात करण्यात आला आहे. त्यापैकी सावलगाव, सोनेगाव ही दोन गावे नदी तीरावर वसले आहेत. सोनेगाव ते पारडगाव रस्ता केवळ चार-पाच किमीचे अंतर आहे. सोनेगाववासीयांना आरमोरी, गांगलवाडी येथे जाण्यासाठी पारडगाववरून जाणे सोयीचे होते. वेळ व खर्चात बचत होते. म्हणून या मार्गाचा वापर नागरिक करतात. तालुका जरी ब्रम्हपुरी असला तरी या गावाचा समावेश चिमूरमध्ये असल्यानेच या रस्त्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची नागरिक आरोप करीत आहेत. या रस्त्यावर चिखलमय वाट शिल्लक असून कोणतेही वाहन चालविणे कठीण आहे. रस्त्याच्या कडेला झुडुपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे ही वाटच दिसेनाशी झाली आहे.
कोट
दोन्ही मार्ग प्रवास करण्यास कठीण आहेत. सोनेगाव मार्ग जवळ असून आरमोरी, गांगलावडी येथे जाण्यासाठी सोईचे होते. मात्र, दोन्ही रस्ते अत्यंत खराब असल्याने त्रास सहन करावा लागतो. याकडे शासनाने लक्ष देऊन त्वरित सुधारणा करावी.
- राजेश पारधी, माजी सरपंच, सावलगाव व माजी संचालक, कृउबास, ब्रम्हपुरी