शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
2
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
3
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
4
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
5
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
6
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
7
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
8
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
9
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
10
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
11
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
12
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
13
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
14
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
15
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
16
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
17
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
18
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
19
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
20
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...

पालकांनो सावधान ! प्रेम प्रकरणातून पलायन वाढले

By admin | Published: May 01, 2017 12:36 AM

तालुक्यात गेल्या वर्षभरात दहा युवक-युवतींसह विवाहिता बेपत्ता झाल्या आहेत. यातील अनेक जोडपी लग्न बेडीत अडकली आहेत.

चिमूर तालुक्यात दहा अल्पवयीन जोडप्यांचे पलायन : पालकांसह पोलीस यंत्रणाही हैराणचिमूर : तालुक्यात गेल्या वर्षभरात दहा युवक-युवतींसह विवाहिता बेपत्ता झाल्या आहेत. यातील अनेक जोडपी लग्न बेडीत अडकली आहेत. संबंधीतांच्या काही पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रत्यक्षात पोलीस दप्तरी जरी दहा जणांची नोंद असली तरी ठाण्याबाहेर व तंटामुक्त समित्याद्वारे मिटविल्या जाणाऱ्या अशा प्रकरणाची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे पालकासह पोलीस यंत्रणाही हैराण झाली आहे. या प्रकरणामुळे पालकांनी वेळीच सावधान होण्याची वेळ आली आहे.पळून जाणारे अनेकजण लग्न उरकूनच घरचा रस्ता धरत आहेत. तर अल्पवयीन असलेल्या युवक-युवतींना पालकांच्या हवाली नाही तर सुधारगृहात पाठवण्याची कसरत पोलिसांना करण्याची वेळ येत आहे. अनेक युवकांवर पास्को अंतर्गत कारवाई करावी लागत आहेत. त्यामुळे पालकांनो आता सावधान! म्हणण्याची वेळ येवून ठेपली आहे. चिमूर तालुक्यातील चिमूर व भिसी या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकरणाची नोंद होत आहे. या सर्व घटनामागे प्रेमप्रकरण, एकतर्फी प्रेम व घरच्यांचा लग्नास विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील दोन विवाहिता आपल्या दोन मुलांना घरी सोडून शेजारील इसमासह बेपत्ता झाल्या आहेत. तर अलीकडेच काही महाविद्यायालयीन युवतीही आपल्या महाविद्यालयीन व शेजारी युवकांबरोबर बेपत्ता आहेत. यापैकी दोन युवतींना शोधून आणण्यास चिमूर पोलिसांना यश आले आहे.अलीकडच्या काळात मोबाईलसह अन्य साधनांमुळे जग अगदी जवळ आले आहे. काहीजण शिक्षणासाठी शहरात जात असले तरी त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. पालकांचे पाल्याकडे होणारे दुर्लक्ष देखील त्याला कारणीभूत ठरत आहे. चित्रपटामुळेही सद्याचा युवक, युवतीच्या वागण्यामध्ये फरक पडला आहे. मुलीमध्ये तोंडाला स्कार्फ बांधण्याचे प्रमाण वाढले असून पालक देखील समोरून येणाऱ्या आपल्या पाल्याला ओळखेनासे झाले आहेत. (प्रतिनिधी)लग्नासाठी अपेक्षा वाढल्याआई-वडीलाना आपल्या पाल्यांना वधू-वर बघताना नाकी नऊ येत आहे. दोघांचेही शिक्षण चांगले होवूनही दोन्ही बाजूच्या वाढत्या अपेक्षा त्याला कारणीभूत ठरत आहेत. पाल्याने घरच्यांच्या विरोधात परजातीतील युवक अथवा युवतीशी लग्न केल्यास सुरुवातीला विरोध करणारे पालक शेवटच्या क्षणी मूक संमती देत असल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे.काळानुरुप व्याख्या बदलल्याभारतीय संस्कृतीवर पाश्मिात्य संस्कृती भारी पडत आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार महाविद्यालयीन युवक-युवतीमधील संबंधातील व्याख्या बदलत चालल्या आहेत. १५ वर्षाअगोदर प्रियकर व प्रेयशी असे संबोधले जात होते. मात्र आता ‘बायफ्रेंड’ व ‘गर्लफ्रेंड’ असे संबोधल्या जाते. हा प्रकार चक्क आपल्या पालकांनाही सांगितल्या जात आहे.चिमूर पोलीस ठाण्याअंतर्गत एका वर्षात दहा युवक-युवती पळून जाण्याच्या घटनेची नोंद असली तरी बाहेर समेट घडवल्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे पालकांनी पाल्यांच्या हालचालीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. - दिनेश लबडे, ठाणेदार, चिमूर.