राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मक विचार रुजविणे आणि बालविवाहाचे प्रमाण रोखून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी १ जानेवारी २०१४ पासून सुरू झालेल्या सुकन्या योजनेतंर्गत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील २४ हजार ७१६ पालकांनी आपल्या मुलींची खाती उघडली. यामध्ये कोट्यवधी रूपये जमा झाले असून यंदाचे उद्दिष्टही पूर्ण गाठण्यास चंद्रपूर डाक विभागाला मोठे यश आले आहे.मुलींचे शिक्षण व आरोग्य सुधारणा करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्याबरोबरच बालिकांच्या भ्रुणहत्येला आळा घालण्यासाठी ही योजना जिल्ह्यात परिणामकारक ठरली आहे. या योजनेतंर्गत ० ते १० वर्षांच्या आतील मुलींसाठी ही योजना लागू आहे. योजना सुरू झाल्यानंतर सुरूवातीला खाते उघण्यासाठी एक हजार जमा करावे लागत होते. परंतु, आॅक्टोबर २०१८ पासून यामध्ये बदल करण्यात आला आहे. या खात्याची मुदत २१ वर्षांपर्यंत ठरविण्यात आली. एका वर्षात खात्यात कमीतकमी एक हजार ते जास्तीजास्त एक लाख ५० हजार रूपयांपर्यंत भरणा करता येतो. मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिक्षण व लग्नासाठी ५० टक्के रक्कम काढता येते. जमा रकमेवर ८.५ टक्क्याच्या आकर्षक व्याजासह रक्कमेवर आयकर सवलत राहणार आहे. पालक दोन खातेही उघडू शकतात. एका मुलीचे खाते उघडल्यानंतर जुळ्या मुली झाल्यास त्या प्रमाणात एकाच वेळी दोन खाते उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. योजनेची माहिती आदिवासी भागात पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढे येण्याची गरज जागरूक पालकांनी व्यक्त केली.जिल्ह्यात २९ आधार केंद्रविमा योजनेत समाविष्ट मुलींसाठी शिक्षा सहयोग योजनाही लागू आहे. मुलीचा विवाह १८ वर्षांच्या आत झाल्यास सदर रक्कम पालकाला न देता शासनाच्या खात्यात जमा केल्या जाते. नागरिकांना आधार काढण्यासाठी अडचणी येऊ नये, याकरिता डाक विभाग अंतर्गत २९ केंद्र सुरू आहेत. आधार केंद्रांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली.जिल्ह्याची उद्दिष्टपूर्तीचंद्रपूर डाक विभागतंर्गत चंद्रपूर व गडचिरोली हे दोन जिल्हे येतात. जिल्ह्याला २ हजार ६०४ खात्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ६०४ शाखा, ५३ उपशाखा व १ मुख्य कार्यालयाने नियोजनबद्ध कार्य केल्याने उद्दिष्टपूर्ती होऊ शकली.२५० रूपयांत उघडता येतेसुकन्या समृद्धीचे खातेसदर योजनेतंर्गत आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेतंर्गत मुलीच्या नावाने जमा केलेल्या रकमेतून नाममात्र १०० रुपये प्रतिवर्ष हप्ता जमा करुन मुलीच्या कमावत्या पालकाचा विमाही उतरविला जातो. मुलींच्या भविष्याचा विचार करून २५० रूपयात सुकन्या समृद्धीचे खाते उघण्यास परवानगी देण्यात आली आहे.नेटबँकेकडे वाढता कलडाक विभागाने काळानुसार अनेक योजना सुरू केल्या. त्यामध्ये शहरी, ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना कसा लाभ होईल, याचा विचार करण्यात आला. काही वर्षांपूर्वी डाक विभाग म्हणजे कासवगतीने काम अशी टीका केल्या जात होती. परंतु, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगाच्या पाठीवर कुठेही सेवा देण्यास डाक विभाग सज्ज झाला. याचे दृश्य परिणाम चंद्रपूर जिल्ह्यातही दिसून येत आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही नवीन बँक प्रणाली (आयईपीपीबी) गतवर्षी सुरू करण्यात आली. याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. नोव्हेंबरपर्यंत १५ हजार खाते उघडण्यात आले. अल्पशिक्षित नागरिकही या नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे सेवा घेत आहेत.
‘सुकन्या समृद्धी’साठी पालकांनी उघडली २४ हजार ७१६ खाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 6:00 AM
मुलींचे शिक्षण व आरोग्य सुधारणा करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करण्याबरोबरच बालिकांच्या भ्रुणहत्येला आळा घालण्यासाठी ही योजना जिल्ह्यात परिणामकारक ठरली आहे. या योजनेतंर्गत ० ते १० वर्षांच्या आतील मुलींसाठी ही योजना लागू आहे. योजना सुरू झाल्यानंतर सुरूवातीला खाते उघण्यासाठी एक हजार जमा करावे लागत होते.
ठळक मुद्देडाक विभागाची उद्दिष्ट्यपूर्ती : ‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहिमेला प्रतिसाद