मासळ (बु) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेल्या कोलारा ग्रामपंचायत येथे केंद्रातील ग्रामविकास योजनांचा आढावा व त्या योजनेची अंमलबजावणी जाणून घेण्यासाठी स्थायी समितीचे खासदार नारायणभाई रठवा यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांच्या समितीने शुक्रवारी सकाळी ८ वाजता कोलारा ग्रामपंचायतीला भेट दिली.
केन्द्र शासनाच्या प्रधानमंत्री घरकुल आवास योजना, मनरेगा, आपले सेवा सरकार, बचतगट, तसेच केंद्रातील ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी राज्य शासनाकडून जिल्हास्तरावर, तालुका व गाव स्तरावर कितपत होते, याचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत भवनाची पाहणी केली. आपले सरकार सेवा केंद्रातील योजना, बचत गटाबाबत माहिती, रोजगार हमी संबंधित माहिती घेतली. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत भवनाविषयी नियोजन आराखडयात घ्यावे, अशा सूचना केल्या. त्यानंतर गावातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधकाम केलेल्या घरकुल, शौचालयाची पाहणी केली. गावात नागरिकांना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेविषयी माहिती विचारली असता, गावकऱ्यांना या योजनेची माहिती नसल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष नारायणभाई रटवा, खासदार सुजित कुमार, खासदार दुबे, खासदार अजय प्रताप सिंग, मुख्य सचिव देशराज, कोलारा ग्रामपंचायत सरपंच शोभा कोयचाडे, उपसरपंच सचिन डाहुले व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
बॉक्स
समितीची जिल्हा प्रशासनासोबत बंदद्वार चर्चा
केंद्रीय संसदीय स्थायी समितीचे नारायणभाई रटवा, खासदार अजय प्रतापसिंग, खा. सुजितकुमार यांनी जिल्हाधिकारी अजय गुलहाणे, जिल्हा पोलीस निरीक्षक अरविंद साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांच्यासोबत बंदद्वार चर्चा केली.
200821\img-20210820-wa0145.jpg
ग्रामपंचायत मार्फत समस्याचे निवेदन देताना कोलरा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य