वामनराव चटप : उद्या विदर्भाच्या मागणीसाठी रेलरोकोवरोरा : विदर्भ राज्य आदोलन समितीच्या वतीने केद्र सरकारने विदर्भ राज्य तातडीने निर्माण करावे, या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी याशिवाय शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सेवाग्राम येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येत आहे.शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज व वीज बिल संपवावे, चार लाख बेरोजगारांच्या नोकऱ्यांचा अनुशेष तातडीने भरून विदभातील युवकांना नोकरीत सामावून घेण्यात यावे, केंद्र सरकारने स्वता:हून कबुल केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च $ ५० टक्के नफा धरून शेतमालाचे रास्तभावाचा निर्णय केव्हापासून लागू करणार तसेच महिलांवरील व बचय गटांवरील मायक्रो फायनॉन्स कर्ज संपवून त्यांची कर्जमुक्ती केव्हा करणार आणि शेतीपंपाचे वीज बिल केव्हापासून निम्यावर आणणार आदी ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक होण्याकरिता सेवाग्राम येथे रेल रोको आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातून हजारों महिला, युवक, शेतकरी, तसेच विदर्भवादी सहभागी होणार असल्याची माहिती माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अॅड. शरद कारेकर, युवा आघाडीचे जिल्हा सचिव आशिष घुमे आदी उपस्थित होते.जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अॅड. चटप यांनी केले. (शहर प्रतिनिधी )
हजारो विदर्भवादी आंदोलनात होणार सहभागी
By admin | Published: April 05, 2017 12:44 AM