लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मंगळावर पाणी शोधण्याचे स्वप्न आम्ही पाहात असताना पृथ्वीवर पाणी मिळेल की नाही, याची चिंता करण्याचे दिवस आहेत. माणसाने सर्वाधिक निसर्गाचे शोषण केले असून आता वसुंधरेचे ऋण फेडण्याचे दिवस असून सर्वांनी वृक्षारोपणाच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगडे यांच्या नेतृत्वात सलग तिसऱ्या वर्षी जिल्ह्यामध्ये वृक्षदिंडी काढण्यात येत आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गृह जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यांमधून दरवर्षी वृक्षारोपण मोहिमेमध्ये मोठया प्रमाणात वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन केली जात आहे. देवराव भोंगळे यांनी सातत्यपूर्ण वृक्षलागवडीच्या मोहिमेत सक्रियतेने सहभाग घेतल्याबद्दल आज त्यांचे वनमंत्र्यांनी कौतुकही केले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, सभापती संतोष तंगडपल्लीवार, अर्चना जीवतोडे, गोदावरी केंद्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, मनपा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषदेचे सदस्य व जिल्ह्यातून आलेले पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी वृक्षारोपणाच्या आपल्या मोहिमेबद्दल बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही मोहीम पुढच्या पिढीच्या भविष्याची जोडली गेली असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, पृथ्वीच्या इतिहासामध्ये ८२० ते ३०२० या दोनशे वर्षांच्या काळात ५० टक्के जंगल नष्ट झाले आहे. निसर्गाचे सर्वाधिक शोषण मानवाने केले आहे. आम्ही मंगळावर पाणी शोधायला निघालो. परंतु पृथ्वीवर पाणी मिळणार की नाही, याची चिंता करण्याचे हे दिवस असून धरतीचे जे कर्ज आमच्यावर आहे ते ऋण फेडण्याची ही मोहीम आहे.प्रत्येक माणसाला २१ हजाराचा प्राणवायू दररोज लागतो. प्रत्येक झाड हे आॅक्सिजन निर्मितीचे काम करत राहते. त्यामुळे आॅक्सिजन ज्याला ज्याला हवा त्या प्रत्येकाने आपल्यावरचे कर्ज समजून धरतीचे ऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण मोहिमेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. देवराव भोंगळे यांनी यावर्षी वनमंत्र्यांना ३३ कोटी वृक्ष लागवडीची अपेक्षा महाराष्ट्रातून असून यामध्ये चंद्रपूर जिल्हा आपले भरीव योगदान देईल, असे आश्वासन दिले.सरपंचांचा सत्कारयावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेणाऱ्या सरपंच यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सरपंच उपस्थित होते. महाराष्ट्रात २७ हजार सरपंच कार्यरत आहेत. प्रत्येकाने पर्यावरणाचे ऋण फेडण्यासाठी आपल्या गावामध्ये यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या विकासकामांचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. सर्वांना हेवा वाटेल अशा पद्धतीच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या निर्मितीमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
धरतीचे ऋण फेडण्यासाठी वृक्ष लागवडीत सहभागी व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 10:35 PM
मंगळावर पाणी शोधण्याचे स्वप्न आम्ही पाहात असताना पृथ्वीवर पाणी मिळेल की नाही, याची चिंता करण्याचे दिवस आहेत. माणसाने सर्वाधिक निसर्गाचे शोषण केले असून आता वसुंधरेचे ऋण फेडण्याचे दिवस असून सर्वांनी वृक्षारोपणाच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्हा परिषदेच्या वृक्ष व स्वच्छता दिंडीची दिमाखदार सुरुवात