या सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कडू होत्या. कार्यक्रमाचे मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे नागपूर विभाग पदवीधरचे आमदार अभिजित वंजारी व शिक्षक आमदार नागो गाणार उपस्थित होते. नागो गाणार यांनी अभ्यासू विचार करत २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना पेन्शन बाबत झालेला अन्याय दूर करणार असे आश्वासन दिले. अभिजित वंजारी यांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत शिक्षकांवरील अन्याय दूर होणार नाही, शिक्षकांना पेन्शन मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी घोषणा देत प्रश्न मार्गी लावणारच असे ठाम मत व्यक्त केले. यावेळी शिक्षक प्रशांत भुरे, दैवत बोरकर,(वाढोणा) अनिल बेहरे, गुलाब मांढरे,(सावरगाव) देवीदास चिलबुले, ज्ञानेश्वर सोनकुसरे, संजय बोरकुटे, प्रमोद भोयर, विजय पारधी उपस्थित होते.
शिक्षकांच्या सहविचारी सभेत नागभीडमधील शिक्षकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:34 AM