या प्रकरणाची पंचायत समिती विभागाकडून अजूनपर्यंत चौकशी करण्यात आलेली नाही. याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य संजय गावतुरे यांनीसुद्धा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत बनावट पावतीची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी केली. यासंदर्भात तत्कालीन गट विकास अधिकारी गावडे यांना विचारणा केली असता, पंचायत समितीचे ग्राम विस्तार अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगितले; परंतु संबंधित ग्रामविस्तार अधिकारी यांनी अजूनपर्यंत या प्रकरणाचा तपास न केल्याने ग्रामविकास अधिकाऱ्यास पाठबळ देऊन तपास करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी जर लवकर तपास न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचे पाथरी ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांनी सांगितले.
कोट
बनावट पावतीचा घोळ समोर आला आहे. याप्रकरणी मागील महिन्याच्या पाथरी येथील ग्रामविकास अधिकारी यांच्याविरुद्ध लेखी तक्रार गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे; परंतु अद्याप या प्रकरणाची चौकशी झाली नसून, चौकशी अहवाल मिळालेला नाही.
प्रफुल तुम्मे, उपसरपंच ग्रामपंचायत, पाथरी.