रुग्णांचे हाल : जिल्हा सामान्य रुग्णालयात कफसिरपचा तुटवडाचंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मागील अनेक दिवसांपासून खोकल्याचे औषध तथा अन्य औषधांचा तुडवडा आहे. यामुळे रुग्णांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. सध्या थंडीचा जोर कायम आहे. अनेकजण ताप तथा खोकल्याने त्रस्त आहे. अशावेळी नागरिक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जात आहे. मात्र येथे औषध उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आल्या पावली रुग्णांना परतावे लागत आहे. येथील रुग्णालयात जिल्ह्यासह शेजारीच वणी तसेच आंध्र प्रदेशातील काही गावांतील नागरिक उपचारासाठी येतात. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. डॉक्टर औषध लिहून देत आहे. मात्र औषध वितरक औषध उपलब्ध नसल्याचे सांगून वापस पाठवित आहे. (नगर प्रतिनिधी)नि:शुल्क तपासणीसाठी आकारतात फीजननी सुरक्षा योजनेंतर्गत रुग्णालयात येणाऱ्या गरोदर मातांच्या तपासणीसाठी शासनाने नि:शुल्क योजना सुरु केली आहे. मात्र येथील रुग्णालयात गरोदर मातांकडून तपासणी फी च्या नावावर प्रत्येकी पाच रुपये आकारल्या जात आहे. नेमका हा पैसा कुठे जातो याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. विशेष म्हणजे, याबाबत कुठलीही पावती दिली जात नसल्याची गरोदर महिलांची तक्रार आहे.सिस्टर करतात रुग्णांवर उपचारजिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अनेकवेळा ठरवून दिलेल्या वेळेत डॉक्टर उपस्थित राहत नाही. अशा वेळी उपस्थित असलेल्या सिस्टर रुग्णांवर उपचार करतात. जिल्ह्यात मोठ्या संख्येने बोगस डॉक्टर असल्याची ओरड होत असताना आता चक्क जिल्हा सामान्य रुग्णालयातच रुग्णांवर जर डॉक्टरविना उपचार होत असेल तर, रुग्णांनी जायचे तरी कुठे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. किमान रुग्णांच्या जीवाशी तरी रुग्णालय प्रशासनाने खेळू नये, अशी मागणी आहे.
रुग्णसेवेचा बट्ट्याबोळ
By admin | Published: January 10, 2015 10:50 PM