शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

कर्जमाफीसाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 11:59 PM

एकीकडे शासन डिजीटल इंडिया, शायनिंग इंडियाच्या बाता मारत असताना महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यात इंटरनेटची गंभीर समस्या आहे.

ठळक मुद्देजिल्हाभर हीच स्थिती : जिवती तालुक्यातील शेतकºयांची गडचांदूरकडे धाव

आशिष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : एकीकडे शासन डिजीटल इंडिया, शायनिंग इंडियाच्या बाता मारत असताना महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यात इंटरनेटची गंभीर समस्या आहे. अशातच राज्य सरकारने शेतकºयांची कर्जमाफी केल्याची घोषणा केली. मात्र आॅनलाईन अर्ज भरण्याची अट ठेवल्याने दुर्गम भागातील शेतकºयांना इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरण्यासाठी ४० ते ५० किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. जिवती व कोरपना तालुक्यातील या गंभीर परिस्थितीमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे.कर्जमाफीचा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शासनाने १५ सप्टेंबर २०१७ ही अंतिम तारीख दिली आहे. या तारखेपर्यंत अर्ज भरण्यासाठी जिवती तालुक्यातील शेतकºयांची गडचांदूर येथील इंटरनेट कॅफेमध्ये रिघ लागली आहे. लिंक नसल्यामुळे वेबसाईट दिवसभर बंद असते. अशावेळी ताटकळत वाट बघण्यापेक्षा गावाकडे जाऊन पुन्हा दुसºया दिवशी परत यावे लागते. शेतकºयांना कॅफेमध्ये आपला नंबर लावायचा झाल्यास सकाळचे जेवण न करता पहाटेच वाहन पकडून गडचांदूर गाठावे लागते. जिवती तालुक्यातील तेलंगाना सीमेवरील शेतकरी रोज ये-जा करीत आहे. मात्र वाट बघूनही अर्ज न भरल्याने त्यांना फार मानसिक त्रास होत आहे. शासनाच्या आॅनलाईन अर्ज भरण्याच्या भानगडीत अनेक शेतकरी कर्जमाफीचा अर्ज भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.महिला शेतकºयांचीही गर्दीज्यांच्या नावाने शेतजमीन आहे, त्यांनाच अर्ज भरता येतो. सातबारा ज्यांच्या नावे आहे, त्यांचा अंगठ्याचा ठसा आॅनलाईन घेतल्याशिवाय अर्ज अधिकृत होत नाही. कारण शेतकºयाची खरी माहिती पटावी, यासाठी आधार लिंक असल्याने बोटाचा ठसा महत्वाचा झाला आहे. शेतजमीन नावावर असणाºया अनेक शेतकरी महिलासुद्धा आहे. त्यामुळे महिलांना घरकामे सोडून दोन-तीन दिवस पूर्णवेळ खर्च करावे लागत आहे.आमच्या जिवती तालुक्यात इंटरनेट बरोबर नसल्याने मी गडचांदूरला येऊन अर्ज भरीत आहो. सर्व कागदपत्रे घेऊन वाट बघत आहो. पण नंबरच लागत नाही. पुढच्या शेतकºयाला विचारल्यास लिंक नाही म्हणून सांगण्यात येते. असे करता-करता पाच दिवस झाले. पण अजूनही अर्ज भरला नाही. कामधंदे सोडून ४५ किलोमीटर दुरून आल्यानंतर काम होत नाही.- अंगद शिवराज ठोंबरे, नारपठारयाअगोदर पण कर्जमाफी झाली होती. तेव्हा आम्ही बँकेत न जाता बँकेचे कर्मचारी आमच्या घरी यायचे आणि अर्ज भरायचे. मात्र आता परिस्थिती उलट झाली आहे. आता आमचा त्रास वाढला आहे. शेतातील कामे सोडून आम्ही रोज अर्ज भरायला येत आहो. तरी पण अर्ज भरल्या जात नाही आहे. काय करावे काहीच समजत नाही.-पांडुरंग साधू सूर्यवंशी,मरकलमेटाजनतेला रांगेत उभे करण्याचे धोरणज्याप्रमाणे नोटाबंदी करून मोदी सरकारने देशातील जनतेला रांगेत उभे केले. तसेच फसवी कर्जमाफी करून राज्यातील फडणवीस सरकारने गरीब शेतकºयांना रांगेत उभे केले. जनतेला रांगेत उभे करून त्रास देण्याचे भाजपा सरकारचे धोरण आहे. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी अजूनही इंटरनेट पोहचले नसल्याने शेतकरी आॅनलाईन अर्ज भरू शकले नाहीे. शेतातली कामे सोडून ४-५ दिवस शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी रांगेत राहावे लागत आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. कोणतीही अट न ठेवता शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी.- सुभाष धोटे, माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस, कॉंग्रेस