बल्लारपूर : बल्लारपूर हे शहर मोठ्या झपाट्याने स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे शहर आहे. त्याला कारणही तसेच आहे. मागील ५-६ वर्षांत बल्लारपूरचा मोठ्या प्रमाणावर कायापालट झाला. महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक बसस्थानक म्हणून येथील बसस्थानकाला मान मिळाला. दूर दूरवरून लोक हे बसस्थानक बघायला आजही येतात. यासोबतच शहराच्या शोभेसाठी मयूरपंखी पथदिवे लावले. मात्र, मागील काही महिन्यांपासून ते बंद आहेत.
वॉर्डातील कानाकोपऱ्यात रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले. शहरात तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, उपविभागीय इमारत, वाचनालय व सरकारी रुग्णालयांसारख्या अनेक शासकीय इमारती मागील काही वर्षांत बनविण्यात आल्या. शहराला अधिक सुशोभित करण्यासाठी मागील वर्षी नवीन वर्षाच्या पर्वावर येथील कालामंदिर ते जुने बसस्थानकपर्यंत चौपदरी रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून मोरपंखी पथदिवे लावण्यात आले होते. हे दिवे शहरातील साैंदर्यात निश्चितच भर पाडणारे होते. सोशल मीडियावरसुद्धा याची लोकांनी प्रशंसा केली. हे मोरपंखी दिवे काही महिने नित्यनेमाने सुरू होते. परंतु कालांतराने त्याचा लखलखाट बंद पडला व परिणामी ते मागील चार महिन्यांपासून बंद असून काहींची तर दशा खूपच वाईट झाली आहे. लाखो रुपये खर्च करून सुरू केलेले हे मोरपंखी दिवे परत सुरू करण्यात यावेत, अशी मागणी लोकांकडून होत आहे.
===Photopath===
300621\20210629_061615.jpg
===Caption===
बल्लारपुरातील मोरपंखी शोभेच्या प्रकाश दिवे मागील अनेक महिन्यापासून बंद