सन २०२० मध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत एकूण ५०८ अपघात झाले आहेत. यामध्ये १९३ गंभीर अपघात झाले आहेत. यामध्ये २१४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये ६० टक्के मृत्यूचे प्रमाण दुचाकीने तर १४ टक्के मृत्यूचे प्रमाण चारचाकी वाहनाचे आहे. विशेष म्हणेज मृत्यू पडलेल्या दुचाकी स्वारांपैकी कुणीही हेल्मेट परिधान करुन नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता दुचाकीस्वारांना हेल्मेट व चारचाकी वाहन चालकांना सिटबेल्ट सक्तीचा निर्णय पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घेतला आहे. नव्या वर्षापासून महामार्गावर विना हेल्मेट फिरणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेल्मेटचा तर चारचाकीस्वारांनी सिटबेल्टचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले आहे.
बॉक्स
दोन तास करणार समुपदेशन
विना हेल्मेट फिरणाऱ्या दुचाकीस्वार व विना सिटबेल्ट फिरणाऱ्याविरुद्ध वाहतूक पोलीस कारवाई करणार आहेत. यावेळी त्यांच्यावर दंड ठोकण्यात येणार आहे. तसेच त्यांचे दोन तास समुपदेशन करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांनी केले आहे.
बॉक्स
अपघाती मृत्यमध्ये विना हेल्मेटधारकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी महामार्गावर विना हेल्मेट फिरणारे किंवा विना सिटबेल्ट लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.