शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आयुध निर्माणीतील कामगारांच्या प्रलंबित समस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:12 AM

मागील काही वर्षांपासून आयुध निर्माणीतील नोकरभरती तसेच अनुकंपाधारकांची भरती खोळंबलेली आहे. परिणामी बेरोजगारांची संख्या वाढत आहे. कामगारांच्या समस्यांबाबतची अमंलबजावणी होत नसल्याची तक्रार ना. हंसराज अहीर यांना प्राप्त झाली.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचा पुढाकार : कामगार संघटना व पदाधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : मागील काही वर्षांपासून आयुध निर्माणीतील नोकरभरती तसेच अनुकंपाधारकांची भरती खोळंबलेली आहे. परिणामी बेरोजगारांची संख्या वाढत आहे. कामगारांच्या समस्यांबाबतची अमंलबजावणी होत नसल्याची तक्रार ना. हंसराज अहीर यांना प्राप्त झाली. याची दखल घेत अहीर यांनी शनिवारी निर्माणीतील सर्व कामगार संघटनांच्या पदाधिकारी, निर्माणी प्रशासनातील अधिकारी यांची बैठक वसाहतीतील हिरा हाउस येथे घेउन अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा केली. याप्रसंगी या समस्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन अहीर यांनी कामगार नेत्यांना दिली. तसेच याबाबतची कारवाई करण्याचे निर्देश निर्माणी प्रशासनाला दिले.सन २०१२ व २०१६ या काळात येथील निर्माणीमध्ये विविध पदांसाठी ५६८ रिक्त जागा भरण्याबाबत जाहिरात काढण्यात आली होती. या जागांसाठी पात्र अर्जदारांनी अर्जसुद्धा केले होते. मात्र त्यानंतर या जागांची भरती खोळंबली. यावर निर्माणी प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याचप्रमाणे येथील २४० अनुकंपाधारकांची निवड प्रक्रिया दोन वर्षापूर्वीच पार पडली. यात पाच टक्के प्रमाणे ३५ जागा भरण्याची निर्माणी प्रशासनाने कारवाई केली. याबाबतची यादीही प्रकाशित केली. परंतु, भरतीची कारवाई अजूनही सुरू करण्यात आली नाही. सद्यास्थितीत एकही जागा भरण्यात आली नाही. यावर त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश अहीर यांनी बैठकीत महाप्रबंधकांना दिले.त्याचप्रमाणे येथील दवाखान्यात पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने रूग्णांना येथून नागपूरला हलविण्यात येते. त्यामुळे रूग्ण आणि नातेवाईकांना हेलपाटे खावून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या दवाखान्याचे आधुनिकीकरण करून येथे सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.बैठकीला आयुधनिर्माणीचे महाव्यवस्थापक रजनिश लोडवाल, महेश गुप्ता, तहसीलदार महेश शिंतोळे, राहुल सराफ, माजी नगराध्यक्ष सुनिल नामोजवार, नगरसेवक प्रशांत डाखरे, प्रवणी सातपुते, किशोर गोवारदिपे, पंढरी पिंपळकर, प्रकाश हरीदासन, राकेश पवार, सुनिल पवार, शितल वालदे, भारतीय सुरक्षा मजदूर संघाचे मनीष मत्ते, संजयसिंग, सदानंद गुप्ता व कैलास तिवारी, इंटक राजेश यादव, ओमप्रकाश पांडे, सिटूचे सदानंद वाघ, एनजीओचे संदीप मुळे उपस्थित होते.कामगारांचे शोषण थांबवानिर्माणीतील खासगी कंपन्यांच्या माध्यमातून ४५० कामगार काम करीत आहेत. मात्र, या कामगारांचे आर्थिक शोषण कंपन्यांकडून होत आहे. कामगारांचे वेतन बरोबर मिळत नाही. यात त्वरीत सुधारणा करण्यात यावी, स्थायी कामगारांना काम तथा नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी कामगारांनी केली. याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन ना. अहीर यांनी दिले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर