पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल
घुग्घुस : हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती व सासूविरुद्ध घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घुग्घुसच्या पायलचा विवाह काही महिन्यांपूर्वी रितरिवाजाप्रमाणे पार पडला. त्यानंतर काही दिवसांनी पती व सासूने तिला दीड लाख रुपयांची मागणी करून सातत्याने शारीरिक व मानसिक छड करणे तसेच मारहाण करणे सुरू केले. या त्रासाला कंटाळून पायलने घुग्घुस पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी पती व सासू विरुद्ध ४९८, (अ) ३२३, ५०४ (३४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बंडू मोरे करीत आहेत.