लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथून जवळ असलेल्या खापरी येथील एका इसमावर सोमवारी सकाळी अस्वलाने हल्ला करून गंभीररित्या जखमी केले.ब्रह्मपुरी डिव्हिजन चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत शंकरपूर क्षेत्र कार्यालय डोमा बीटामधील खापरी येथील धनराज बापूंना शेंडे (५२) हे सकाळी शेतावर जाण्यासाठी घरून निघाले. खापरी ते नवतला पांदण रस्त्याने जाताना आपल्या पिल्लांसोबत जात असलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. अशातच त्यांच्या डोक्यावरची टोपी अस्वलाच्या दातात अडकली गेली. या हल्ल्यातून कशीबशी सुटका करून घेत धनराज यांनी गंभीर अवस्थेत गावाकडे धाव घेतली. त्यांच्या डोक्यावर पाठीवर गंभीर जखमा आहेत. त्यांना चिमूर येथे ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता प्राथमिक उपचार करून नागपूर येथे रेफर केले. वनकर्मचारी केदार व नवघडे, पर्यावरणवादी मंडळाचे सदस्य आमोद गौरकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.गावकऱ्यांची माणुसकीधनराज शेंडे यांची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे. जखमी अवस्थेत असताना उपचार कसा करावा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. जवळची जी पुंजी होती ती मागील वर्षी पत्नीच्या अपघातात खर्च झाली. त्यांच्याजवळ कोणतीही रक्कम शिल्लक नव्हती. या बिकटप्रसंगी गावकरी त्यांच्या मदतीला धावून आले. गावातील लोकांनी वर्गणी गोळा करून धनराजला आर्थिक मदत दिली. यासोबतच वनविभागाने त्यांना तीन हजाराची आर्थिक मदत केली.
चंद्र्रपूर जिल्ह्यात अस्वलाने केला गावकऱ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 11:27 AM
चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथून जवळ असलेल्या खापरी येथील एका इसमावर सोमवारी सकाळी अस्वलाने हल्ला करून गंभीररित्या जखमी केले.
ठळक मुद्देगावकऱ्यांनी दाखवली माणुसकी