महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. या शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, यासाठी वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. दहा दिवस विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात प्रामुख्याने चंद्रपूर शहरातील ख्यातनाम समुपदेशक मुग्धा कानगे यांचे व्यक्तिमत्त्व विकास आणि धोरण रणनीती या विषयावर, तर मानसोपचार तज्ज्ञ सोनम कपूर यांचे स्वाफ्ट स्किल : बाॅडी लैंग्वेज ॲण्ड असरटिव्हनेस ट्रेनिंग, तसेच वरोरा येथील प्रसिद्ध उद्योजक रमेश राजूरकर यांचे ग्रामीण रोजगाराच्या संधी आणि डॉ. के. एन. पी राव हैदराबाद यांचे व्यक्तिमत्त्व विकास व आवश्यक गुण या विषयांवर मार्गदर्शन झाले. या दहा दिवसीय शिबिरात ६२ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
विवेकानंद महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:31 AM