लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरात व परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मागील काही दिवसांपासून ‘पेट्रोल नाही’चा फलक दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेलच्या टंचाईने वरोरा शहर व ग्रामीण भागातील वाहनधारक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल व डिझेल मिळविण्याकरिता वाहनधारकांची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे.वरोरा शहरात व शहरालगत चार पेट्रोलपंप आहेत. यातील एक पेट्रोल पंप बंद आहे. तालुक्यात खांबाडा, टेमुर्डा, माढेळी, चरूर (खटी), शेगाव येथेही प्रत्येकी एक पेट्रोल पंप आहे. ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलची टंचाईची आवक कमी असल्याची माहिती आहे. त्यामुळे वरोरा शहरातील पेट्रोल पंपावर मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल व डिझेलची टंचाई ही नेहमीची बाब झाली आहे. वरोरा शहरात न्यायालय, उपविभागीय कार्यालय, पोलीस उपविभागीय कार्यालयासह अनेक अतिमहत्वाची कार्यालये, खासगी कंपन्या व मुख्य बाजारपेठ असल्याने शहरात नागरीकांचे मोठ्या प्रमाणात आवगमन दुचाकी व चारचाकी वाहनाने होत असते. अशा वाहनधारकांना वरोरा शहरात पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याने मोठा भ्रमनिरास होताना दिसून येते. डिझेलअभावी चारचाकी वाहने उभी असल्याने अनेकांचे व्यवसाय दिवाळीच्या तोंडावर डबघाईस आले आहेत. उष्णतामान अधिक असल्याने डिझेल इंजिनवर पाणी घेऊन पिकांना देणाºया शेतकºयांनाही डिझेल टंचाईचा फटका बसत आहे. शहरातील संपूर्ण पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल टंचाई निर्माण होत असताना याची स्थानिक प्रशासनास कुठलीही माहिती नसावी, याबाबत सर्वच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अचानक पेट्रोल संपल्याने टंचाई निर्माण झाल्याचे पंपधारक सांगत असले तरी यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
वरोरा शहरात पेट्रोल, डिझेलची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:42 PM
शहरात व परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मागील काही दिवसांपासून ‘पेट्रोल नाही’चा फलक दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेलच्या टंचाईने वरोरा शहर व ग्रामीण भागातील वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
ठळक मुद्देवाहनधारक त्रस्त : आवकच कमी असल्याची माहिती