शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

पेट्रोल दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 11:13 PM

शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी दुपारी १ वाजता गांधी चौकात गॅस-सिलेंडर, पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देकॉग्रेस व रॉकाची निदर्शने : भाजप सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी दुपारी १ वाजता गांधी चौकात गॅस-सिलेंडर, पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला.यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया, प्रदेश सरचिटणीस डॉ. आसावरी देवतळे यांनी केंद्र व राज्य सरकारने गॅस सिलेंडरचे दर वाढविल्यामुळे जंगलाची कत्तले होतील, चुल पेटल्यामुळे प्रदूषण वाढेल, मोल मजुरी करणारा मंजूर, शेती करणारा शेतकरी वर्षाला ५० ते ६० हजार रुपये कमवतील इतक्या महागाईत पेट्रोल-डिझलच्या दरवाढीमुळे घाऊक वस्तूंचे भाव वधारलेले आहे. महिन्याचे पाच हजार रुपये कमवणारा माणूस मुलांचा शिक्षणाचा खर्च, त्यांचा आरोग्याचा खर्च, विद्युत बिलाचा खर्च, घर टॅक्स, ९१५ रु. सिलेंडर इतक्या महागाईत घर कसे चालवणार आहे. काँग्रेसचे सरकार असताना गॅसचे दर ४०० रुपये होते. आता ते दर ९१५ रुपये झाले आहेत. त्याचप्रमाणे भारत सरकारने आयात केलेल्या तेलाला शुद्ध करुन दुसऱ्या देशााला ३५ ते ४० रु. लिटर प्रतीमध्ये भारत सरकार देत आहेत आणि देशवासियांना पेट्रोल- डिझेल ७८ रु व ८० रु. मध्ये घ्यावे, लागत आहे. देशातील जनतेचे हे शोषण आहे. असा आरोप शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केला.निदर्शन आंदोलणाप्रसंगी काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस नंदा अल्लूरवार, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा डांगे, शिवा राव, अ‍ॅड. मलक शाकीर, विनोद सकत, प्रा. अनिल शिंदे, अ‍ॅड. भास्कर दिवसे, शालीनी भगत, सुनीता अग्रवाल, सचिन कत्याल, नगरसेवक अमजद अली, धनवलकर, फारुक सिद्धकी, मोहन डोंगरे, हरिदास लांडे, चंद्रमा यादव, राजा काझी, राजू दास, हरिदास डाखरे, राजेश अडूर, सुरेश आत्राम, बंडोपंत तातावार, दीपक कटकोज वार, राजू दास, हरीदास डाखरे, राजेश अडूर, सुरेश आत्राम, बंडोपंत तातावार, दीपक कटकोजवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निदर्शनेचंद्रपूर : केंद्रा व राज्यात भाजपा सरकार आल्यापासून पेट्रोल व डिझेलची सतत भाववाढ होत असून यामुळे जनसामान्याचे हाल होत आहे. असा आरोप करुन वरोरा नाका चौक परिसरात चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाडीविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार बाळासाहेब साळुंखे, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, दीपक जैस्वाल, ज्योती रंगारी, मंगला आखरे, बाबुराव गेडाम, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष तालुका व शहर अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते.