शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

बसस्थानकावरील पॉकेटमारीला बसणार लगाम, सीसीटीव्हीची राहणार नजर

By परिमल डोहणे | Published: July 08, 2023 2:32 PM

नव्या पोलिस चौकीचे लोकार्पण

चंद्रपूर : शहरातील बसस्थानक परिसरातील पॉकेटमारीला लगाम लावण्याच्या अनुषंगाने बसस्थानक परिसरात पोलिस चौकी गठित करण्यात आली आहे. गुरुवारी या पोलिस चौकीचे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. चंद्रपूर बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन किंवा बसमध्ये चढताना पॉकेट, मोबाइल, दागिने, लेडिज पर्स पळविल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

याला आळा घालण्याच्या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रण अधिकारी स्मिता सुतावने, नियंत्रण अधिकारी मंगेश डांगे यांनी मोक्याची जागी उपलब्ध करून दिली. त्या जागेची नीट सफाई व रंगरंगोटी करून तेथे पोलिस चौकी थाटण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते या बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. सहायक वाहतूक निरीक्षक हेमंत गोवर्धन, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार, रामनगरचे ठाणेदार राजेश मुळे, सहायक पोलिस निरीक्षक अमरदीप खाडे, सफौ गजानन डोईफोडे, पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आठ सीसीटीव्ही कॅमेरे

बसस्थानक परिसरात रामनगर पोलिसांनी लोकसहभागातून आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सतत ध्वनिक्षेपकाद्वारे अनाउन्समेन्ट करण्यात येत आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी दामिनी पथक, बिट अंमलदार, चार्ली, गुन्हे शोध पथक अधिकारी /अंमलदार यांनी सतत गस्त सुरू केली आहे. बसस्थानक परिसरात एखादी संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिस स्टेशन रामनगर ०७१७२-२५३२०० व डायल ११२ येथे माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसchandrapur-acचंद्रपूर