पिपर्डा ग्रामपंचायतीत नऊ सदस्यसंख्या आहे. गेल्या काही वर्षांत अशी ग्रामसभा झाली नसल्याने ग्रामस्थ सुद्धा या ग्रामसभेविषयी जागरूक असल्याचे दिसून आले. सभेमध्ये नवीन वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून अतुल रमेश मेश्राम यांची तर, दारूबंदी अध्यक्ष म्हणून अजय भोजराज भेंडारे यांची निवड करण्यात आली. ग्रामसभेत घरकुल, दारूबंदी या विषयावर साधकबाधक चर्चा करून ठराव पारित करण्यात आले. यावेळी नऊ ठराव पारित करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक गजानन मानकर, सरपंच आकाश भेंडारे, उपसरपंच चंदन चुणारकर, भगवान कावळे, आरोग्य सेवक माणिक भोंडे, तलाठी दडमल उपस्थित होते.
240921\img-20210923-wa0174.jpg
पिपर्डा येथील ग्रामसभा मध्ये निवड झालेल्या समिती पदाधिकारी यांचे अभिनंदन करतना वन कर्मचारी