भद्रावती : चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील भद्रावती बसस्थानक समोरील सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम केलेली सिमेंट काॅक्रिटची नाली बुजाल्याने शहरातील तसेच महामार्गावरील पावसाचे पाणी बसस्थानकामध्ये व इतरत्र परिसरात जात आहे. ही नाली दुरुस्ती करण्याकरिता बांधकाम विभागाने खोदलेल्या खड्ड्याचे मोठ्या खड्ड्यात रूपांतर झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे तो खड्डा प्रवाशांसाठी एक महिन्यापासून जीवघेणा ठरत आहे. बांधकाम विभागाकडून नाली बांधण्याकरिता खोदलेल्या खड्ड्याचे कुठल्याही प्रकारचे काम सुरू नसल्याने त्या खड्ड्यात पावसाचे पाणी व शहरातील वाहून येणाऱ्या पाण्याने तो खड्डा तुडुंब भरला आहे. चंद्रपूर-नागपूर महामार्गावर बसस्थानक, बीएसएनएलचे ऑफिस व त्याच्या लगत आयुध निर्माणी प्रवेशद्वार (चेक पोस्ट ) असून आत प्रवेश करण्याकरिता महामार्ग ओलांडून जावे लागत असल्याने नेमका त्याच ठिकाणी असलेल्या या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही खड्डा चुकविताना त्या ठिकाणी कित्येक दुचाकी चालकांचे अपघात सुद्धा झाले आहे.
240721\img-20210723-wa0029.jpg
महामार्गावरील बस स्थानका समोर खोदलेल्या खड्ड्याचे काम एक महिन्यापासून थंडबस्त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा