रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्यांवर कारवाई
चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेवणाऱ्या ५ वाहनचालकांवर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. यामध्ये चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वरोरा पोलिसांंनी वाहनचालकांवर कलम भांदवि २८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
डासांचा उच्छाद वाढला
वरोरा : तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण जात आहे. परिणाम, डासांचे प्रमाण वाढले असल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
वनसडी ते पिपर्डा रस्त्यावर खड्डे
कोरपना : कोरपना तालुक्यातील वनसडी ते पकडीगुड्डम धरणाला जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून वाहन चालवताना कसरत करावी लागते. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
सुविधेअभावी रुग्णांमध्ये संताप
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केले आहे. मात्र, काही आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही तालुक्यात कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु, यंदा अवेळी पाऊस, बोंडअळीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. यातून गरीब शेतकरी बळी पडण्याची शक्यता आहे. यंदा किडीने कपाशीचे उत्पादन घटले आहे. काही शेतकऱ्यांना खर्च निघणार की नाही, हा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने चौकशी करून कापूस उत्पादकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.