आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदनचंद्रपूर: सध्या राज्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याला शासकीय धोरणच जबाबदार असल्याचे दिसून येते. त्यामुळे गरजू व्यावसायिकांना शासकीय जागा उपलब्ध करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.राष्ट्रीय मार्ग, प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग व इतर प्रमुख मार्गावर सध्या अतिक्रमणाची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेथे शिस्तबध्द पद्धतीचा वापर केल्यास कायमस्वरूपी तोडगा निघून व्यवसाय, वाहतूक, महसूल व स्वच्छता या सर्व बाबी नियंत्रणात राहून शासनाच्या खर्चात बचत घेवून महसूलात मोठ्या प्रमाणात वाढ होवू शकते. या रोडलगत असणाऱ्या सर्व प्रकारच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ यांच्या जागेतील विशिष्ट भाग गरजू स्थानिक व्यावसायिकांना किराया घेवून अटी- शर्तीचे अधिन राहून उपलब्ध करुन देण्याची मागणी आम आदमी पार्टी सिंदेवाहीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात पार्टीने मुख्यमंत्र्यांना स्थानिक प्रशासनामार्फत निवेदन दिले आहे. निवेदन देण्याकरिता आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मनोहर पवार, हिरालाल इंदोरपूर, मंगला बोरकुंडवार, वंदना गजभिये, जयदेव श्रीरामे, पुष्पा पवार, विनायक गजभिये, मिनाक्षी मेश्राम, एकनाथ खंडारे, वासुदेव पैठणकर, आत्माराम रामटेके उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
गरजू व्यावसायिकांसाठी जागेची मागणी
By admin | Published: April 15, 2017 12:45 AM