चंद्रपूर : मागील काही वर्षांपासून पर्यावरण प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने प्रदूषण कमी करून अधिकाधिक वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. असाच प्रयत्न जैमिनी हरीश ससनकर यांनी केला असून वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण तसेच रक्तदान करून सामाजिक भान जपले आहे.
चंद्रपूर येथील जैमिनी ससनकरने जागतिक ओझोन दिनानिमित्त येथील क्राइट हॉस्पिटल परिसरातील मोकळ्या जागेत विविध वृक्षांचे रोपण केले. त्यानंतर रक्तदान शिबिरही घेतले. या वेळी रक्त संकलन अधिकारी डॉ. अनंत हजारे, डी.के. आरिकर, हरीश ससनकर, ईश्वर मेंढुलकर, अमित अडेट्टीवार, दत्तू क्षीरसागर, निखिल तांबोळी, सुनीता इटनकर, रजनी मोरे, वैशाली ससनकर, शौर्या ससनकर यांची उपस्थिती होती.
बाॅक्स
ओझोनच्या स्तराचे नुकसान
ओझोनचा स्तर हा सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करतो. मात्र वातावरण बदल, प्रदूषणामुळे सृष्टीतील ओझोनच्या स्तराचे दिवसेंदिवस नुकसान होत आहे. जे मानव जीवनासाठी धोकादायक ठरू शकते. ओझोन स्तराला वाचवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. यात प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहनाने प्रवास करणे, रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळणे व जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे हे उपाय करायला पाहिजे.