राज्यभरात प्लास्टिक बंदीनंतर चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला. अचानक कारवाई करुन दंड वसूल केल्याने काही प्रमाणात प्लास्टिक वापरावर अंकूश बसला. यादरम्यान दुकानदारांकडूनसुद्धा प्लास्टिक नसल्याचे सांगितले जायचे त्यामुळे चंद्रपूरसह जिल्हाभरात कॅरिबॅगचा वापर बंद झाला होता. यादम्यान मनपा व प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे प्लास्टिक, थर्माकोल, अविघटनशील वस्तूचे वापर, व विक्री करणाºया दुकानामध्ये धाड टाकून प्लास्टिकसाठा जप्त केला. तर अनेकांकडून दंड वसूल केला. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी तसेच दुकानदारांनी प्लास्टिकचा वापर टाळला होता. मात्र सध्यास्थितीत ही मोहीम थंडावल्याने पुन्हा कॅरिबॅग बाजारात तसेच दुकानामध्ये आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदर मोहीमेची अमंलबजावणी कागदावरच झाल्याचे स्पष्ट होत आहे.
प्लास्टिक बंदी कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:55 AM