लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवित अनेकांवर कारवाई केली. अनेकांकडून दंड वसूल केला. मात्र आता ही मोहीम थंडावली असल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होताना दिसून येत आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदी केवळ कागदावरच झाल्याचे बोलले जात आहे.राज्यभरात प्लास्टिक बंदीनंतर चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला. अचानक कारवाई करुन दंड वसूल केल्याने काही प्रमाणात प्लास्टिक वापरावर अंकूश बसला. यादरम्यान दुकानदारांकडूनसुद्धा प्लास्टिक नसल्याचे सांगितले जायचे त्यामुळे चंद्रपूरसह जिल्हाभरात कॅरिबॅगचा वापर बंद झाला होता. यादम्यान मनपा व प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे प्लास्टिक, थर्माकोल, अविघटनशील वस्तूचे वापर, व विक्री करणाऱ्या दुकानामध्ये धाड टाकून प्लास्टिकसाठा जप्त केला. तर अनेकांकडून दंड वसूल केला. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी तसेच दुकानदारांनी प्लास्टिकचा वापर टाळला होता. मात्र सध्यास्थितीत ही मोहीम थंडावल्याने पुन्हा कॅरिबॅग बाजारात तसेच दुकानामध्ये आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदर मोहीमेची अमंलबजावणी कागदावरच झाल्याचे स्पष्ट होत आहे.दुकानदारांकडून लूटप्लास्टिक पिशवी बंद झाल्यामुळे बाजारामध्ये कापडी पिशव्याचा वापर सुरु झाला. या पिशव्या दुकानात ठेऊन पिशवी नसल्याचे सांगत ग्राहकांकडून पिशवीचे दोन ते तीन रुपये अतिरिक्त आकारत आहेत. मात्र ग्राहकांजवळ साहित्य नेण्यासाठी दुसरे साधन उपलब्ध नसल्याचे अतिरिक्त रक्कम देऊन पिशवी खरेदी करावी, लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.जनजागृतीचा अभावप्लास्टिक पिशवी बंदीबाबत मनपा प्रशासन तसेच प्रदूषण मंडळातर्फे पाहीजे त्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये याबाबत जागृती झाली नाही. तसेच कारवाईची मोहीमसुद्धा थंडावल्याने जिल्ह्याभरात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.प्लास्टिकमुळे जनावरांना धोकाएकदा तयार झालेले प्लास्टिक कधीच नष्ट होत नाही.परिणामी नद्या- नाल्यामध्ये प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आढळून येतात. तसेच जमिनीमध्येही पिशवीचे विघटन होत नसल्याने अनेक प्राणी या पिशव्या खात असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता असते. त्यामध्ये त्याचा जीवही जाऊ शकतो.
प्लास्टिकबंदी कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:58 PM
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम ...
ठळक मुद्देमोहीम थंडावली : बाजारात सर्रास वापर