शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

खर्रा पन्नीच्या निमूर्लनापासून प्लास्टिक बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:13 PM

शहरातील विविध वॉर्डात पसरलेल्या खर्रा प्लॉस्टिकमुळे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नगर परिषदला कमी गुण मिळाले होते़ शहराच्या स्वच्छ प्रतिमेला गालबोट लागू नये आणि कमी गुण मिळण्याची पुनरावृत्ती हाऊ नये म्हणून नगर परिषदने सर्वप्रथम खर्रा पन्नीपासूनच प्लॉस्टिक बंदीची सुरुवात केली आहे़

ठळक मुद्देनगर परिषद : शहराच्या स्वच्छतेला गालबोट लावू नका

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरातील विविध वॉर्डात पसरलेल्या खर्रा प्लॉस्टिकमुळे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नगर परिषदला कमी गुण मिळाले होते़ शहराच्या स्वच्छ प्रतिमेला गालबोट लागू नये आणि कमी गुण मिळण्याची पुनरावृत्ती हाऊ नये म्हणून नगर परिषदने सर्वप्रथम खर्रा पन्नीपासूनच प्लॉस्टिक बंदीची सुरुवात केली आहे़खर्रा पन्नी ही स्वच्छतेच्या मार्गातील सर्वात मोठी डोकेदुखी आहे़ त्यामुळे यावर शंभर टक्के नियंत्रण आणण्यासाठी न.प. द्वारे विशेष पथक तयार केले, अशी माहिती मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी दिली़ जनजागृती सुरु असून नव्या दमाने अंमलबजावणी केली जात आहे़ राज्य सरकारने बंदी घातल्याने घरात असलेला प्लॉस्टिकचा साठा नागरिक भितीपोटी न.प.कडे जमा करीत असल्याचे दिसून येत आहे़जुन्या वस्तुंना येणार ‘अच्छे दिन’काळानुरुप कोणत्या व्यवसायाला ‘अच्छे दिन‘ केव्हा येतील सांगता येत नाही. प्लॉस्टिक बंदीमुळे नव्या पर्यायाचा शोध सुरु झाला आहे. लग्नात वापरण्यात येणाऱ्या प्लॉस्टिक थर्माकोल प्लेटऐवजी पळस, कुकडी पानाच्या पत्रावळी व द्रोण वापरण्याचे वापर प्रमाण वाढू शकते़ किराणा दुकानात प्लॉस्टिकऐवजी कागदाच्या पुड्यांचा वापर वाढू शकतो़ कापड दुकानातील प्लॉस्टिक वापरणे बंद झाल्यास कापडी थैल्यांना चांगले दिवस येतील़ प्लॉस्टिकमुळे पर्यावरण व मानवी जीवनावर अनिष्ट परिणाम होत आहे़ त्यामुळे जुन्या काळातील वस्तु वापरण्यासाठी प्रोत्साहन दिल्यास काही व्यवसायाला ’अच्छे दिन’ येण्यास वेळ लागणार नाही़खर्रा पन्नी मोठी समस्याप्लॉस्टिक बंदी झाल्यास खर्रा पन्नीची सर्वात मोठी समस्या निर्माण होणार आहे. शहरात सर्वाधिक प्लॉस्टिक खर्रा पन्नीमुळे पसरला अशी माहिती महिलांनीच कार्यशाळेत दिली़ त्यामुळे ही समस्या कायमची दूर करण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याची वेळ आली आहे़कर्करुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढप्लास्टिकवर रसायन टाकूनही जमिनीत विरघळत नाही़ ते प्लॉस्टिक पोटातही विरघळत नाही़ प्लॉस्टिकसहीत अन्य घटकांमुळे कर्करोगींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. प्लॉस्टिक शरीराच्या आत गेल्यानंतर विघटनाच्या क्रिया बिघडते़ अपचनीय असल्याने एकाच ठिकाणी राहते. विविध प्रक्रिया घडून पेशींमध्ये अनिष्ट बदल होतात़ यातून कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे़ त्यामुळे प्लॉस्टिकचा वापर टाळणे बंद करण्याची गरज आहे़ पर्यावरणावरही याचा दुष्परिणाम होतो. खर्रा घासण्याच्या प्रक्रियेत पन्नीचा वापर होतो. त्या पन्नीचे कण पोटात जातात त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.- डॉ. विवेक शिंदे,भद्रावती.महिलांकडून जनजागृतीमहिला बचतगटांद्वारे प्लॉस्टिक बंदीविषयी जनजागृती केली जात आहे़ उन्नती बचत गटाच्या महिलांनी नागरिक तसेच व्यावसायिकांना जागृतीची पत्रके वाटली. येत्या तीन दिवसांत विविध महिला बचत गटांद्वारे जनजागृती मोहीम गतिमान केली जाणार आहे़शासनाच्या सगळ्या योजना राबविण्यात भद्रावतीकर अग्रेसर आहेत. प्लॉस्टिक बंदीबाबत सुद्धा भद्रावतीकर सहकार्य करतील, अशी पालिकेला मला खात्री आहे.- अनिल धानोरकर, नगराध्यक्ष,न.प. भद्रावती