लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूर : मिशन शौय अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी माऊंट एवरेस्ट सर करत चंद्रपूर जिल्ह्याची विजय पताका फडकवली. त्याचप्रमाणे येत्या काळात मिशन शक्ती अंतर्गत २०२४ च्या आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील खेळाडू पदकप्राप्त ठरतील, असा विश्वास अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.ऊर्जानगर येथील खुले रंगमंच येथे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत सी.एम. चषक स्पर्धेच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, मिशन शक्ती अंतर्गत आॅलंम्पिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी प्राविण्य मिळवावे. त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता विख्यात सिनेअभिनेता आमीर खान हे चंद्रपुरात येणार आहे. सी.एम. चषक स्पर्धेसाठी स्पर्धकांनी केलेल्या आॅनलाईन नोंदणीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्र राज्यात अव्वल ठरले आहे. या क्षेत्राचा आमदार म्हणून ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. विकास प्रक्रियेसोबत कला व क्रीडा गुणांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. या दृष्टीने आयोजित ही स्पर्धा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आ. नाना श्यामकुळे, जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, प्रमोद कडू, रामपाल सिंह, सभापती ब्रिजभूषण पाझारे, सभापती राहुल पावडे उपस्थित होते.
खेळाडू आॅलिम्पिकमध्ये चमकतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:05 PM
मिशन शौय अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी माऊंट एवरेस्ट सर करत चंद्रपूर जिल्ह्याची विजय पताका फडकवली. त्याचप्रमाणे येत्या काळात मिशन शक्ती अंतर्गत २०२४ च्या आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील खेळाडू पदकप्राप्त ठरतील, असा विश्वास अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : ऊर्जानगरात सी.एम. चषक स्पर्धेचा शुभारंभ