शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

खासगी कंत्राटदाराकडून प्लॉटधारकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 10:25 PM

येथून जवळच असलेल्या देवाळा येथे ‘जेट किंग्डम ब्रिज’ या कंपणीने प्लॉटधारकांना विविध आमिष दाखवून ड्युप्लेक्सची विक्री केली. मात्र बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याने अल्पावधितच घराच्या टाईल्स कोसळत असल्याने प्लॉटधारकांना धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देबांधकामाची चौकशी करा : पोलिसांकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथून जवळच असलेल्या देवाळा येथे ‘जेट किंग्डम ब्रिज’ या कंपणीने प्लॉटधारकांना विविध आमिष दाखवून ड्युप्लेक्सची विक्री केली. मात्र बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याने अल्पावधितच घराच्या टाईल्स कोसळत असल्याने प्लॉटधारकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बांधकामाची चौकशी करुन कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व देवाळा येथील सरपंचाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.चंद्रपूरलगत असलेल्या देवाडा येथील सर्व्हे क्रमांक १३०/३ येथे ‘जेट किंग्डम ब्रिज’ या कंपणीने सन २०१२ साली प्लॉटची विक्री केली. यावेळी अनेकांनी डयुप्लेक्सची खरेदी केली. यावेळी कंत्राटदार राजेश पोलेवार व अलोक घाटे यांनी परिसरात आकर्षक पथदिवे, २४ तास सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरा, डांबर रोड बनवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र कोणत्याही सुविधा करुन दिल्या नाही. तर या ड्युप्लेक्समधील तेलंग यांच्या घरातील टाईल्स आपोआपच जमिनीवर कोसळल्या. याबाबत त्यांनी कंत्राटराकडे तक्रार केली असता, त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच सुविधाही उपलब्ध करुन देल्या नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची फसवणूक झाली असल्याने चौकशी करुन कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.वॅटच्याऐवजी लावले जीएसटी‘जेट किंग्डम ब्रिज’ या कंपणीतर्फे तयार करण्यात आलेले ड्युप्लेक्सचा करार सन २०१२ मध्ये आहे. यावेळी करारामध्ये वॅट लावणे गरजेचे होते. मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर कंत्राटदाराने जीएसटी लाऊन अतिरिक्त रक्कम प्लॉटधारकांकडून वसूल केली आहे. त्यामुळे प्लॉटधारकांची लूट झाली आहे. त्यामुळे कंत्राटदारांची चौकशी करुन कार्यवाही करावी व मोबदला मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.