शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

रत्नापुरातील नळयोजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 11:58 PM

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील नळ योजना काही अंशी ठप्प झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. गुंडभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. रत्नापूर येथील नळयोजनेला शिवणीपासून जवळच असलेल्या उमानदीवरून पाणी पुरवठा होतो.

ठळक मुद्देबंधारा कोरडा : जलशुद्धीकरण केंद्र अवघ्या तीन महिन्यातच बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील नळ योजना काही अंशी ठप्प झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. गुंडभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.रत्नापूर येथील नळयोजनेला शिवणीपासून जवळच असलेल्या उमानदीवरून पाणी पुरवठा होतो. यासाठी नदीमध्ये दोन विहीरींचे बांधकाम करण्यात आले आहे. विहिरीला पाणी पुरवठा करून नंतर मोटरपंपाच्या सहाय्याने पाईपलाईन व्दारे पाण्याचा टॉकीला पाणी पुरवठा होतो. रत्नापूर ग्रामपंचायत अंतर्गत आठ हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे.पिण्याचे पाणी सर्वांना सुलभ मिळावे यासाठी चार पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. या चारही पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी एकाच पाईप लाईनचा उपयोग केला जातो. दरवर्षी पाण्याची समस्या गंभीर होत आहे. यावर्षी पाण्ी समस्या मागील महिण्यापासून अधिकाच गंभीर बनली असून दोन-चार दिवसातून एखाद्या दिवशी पाणी नळाला पाणी येते. अनेकवेळा ती बंदच असते. गावामध्ये गोळ पाण्याचे दुसरे स्त्रोत नसल्यामुळे या नळाच्या पाण्यावरच नागरिकांवर अवलंबून रहावे लागते. गावामध्ये हातपंप, विहिरी आहेत. पण गोड पाणी कुठेही नाही.येथील विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने समस्या आणखीच बिकट झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नळयोजनेला पाणी पुरवठा नियमित व्हावा यासाठी सात- आठ वर्षांपूर्वी उमा नदीवर बंधारा बांधण्यात आला. मात्र, ग्रामपंचायतीचे या बंधाऱ्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे, परिसरातील शेतकरी याच बंधाºयातील पाणी मोटारपंपाद्वारे घेऊन शेतीसिंचन करतात. यावर्षी सुध्दा तेच झाले आणि मार्च महिन्यातच बंधारा कोरडा पडला. त्यातच नदीतील पाण्याची पातळी खालावली आणि नळयोजनेसाठी जलसाठा कमी पडल्याने येथे पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकाच गंभीर झाली आहे.पाण्याची समस्या लक्षात घेऊन रत्नापूर ग्रामपंचायतीने पुन्हा एका विहिरीची मागणी केली. ती मागणी यावर्षीच मंजूर झाली. परंतु बांधकाम सुरू करण्यास संबंधित कंत्राटदाराने दिरंगाई केली. ‘तहान लागली खोद विहीर’ या म्हणीप्रमाणे ज्यावेळी टंचाई निर्माण झाली तेव्हा या विहिरीच्या बांधकामाला सुरूवात केली असती तर कदाचित दोन महिन्यापूर्वी या विहिरीचे बांधकाम झाले असते आणि आता नळाला व्यवस्थित पाणी आले असते. मात्र तसे झाले नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.ग्रामपंचायत प्रशासन, तालुका प ्रशासनाने या समस्याकडे यापूर्वीच लक्ष दिले असते तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली नसती. मात्र याकडे संबंधितांना दुर्र्लक्ष केल्याने आता पाण्यासाठी ग्रामस्थांना वनवन भटकण्याची वेळ आली आहे.टँकरच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्षगावातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊ न ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याचे टँंकर मिळावे, यासाठी तहसीलदार, संवर्गविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाकडे मागणी केली आहे. मात्र अद्यापपर्यंत कुणीही याकडे लक्ष दिले नाही.गावात गुंडभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ असतानाही अधिकारी टँकर पुरवठा करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. किमान टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी करीत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई