शासनाची महत्त्वपूर्ण मोहीम अधिक प्रभावी राबविल्या जावी, लोकांमध्ये मोहिमेची विशेष जनजागृती व्हावी, या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील कवी, लेखकांच्या लेखनातून या मोहिमेचा विशेष प्रचार व प्रसार करणार आहे. फिनिक्स साहित्य मंचातर्फे आयोजित ' संदेश कोरोना लसीकरणाचा ' या विषयावर कविसंमेलन कवी गोपाल शिरपूरकर यांच्या अध्यक्षतेत होईल. संचालन कवी नरेशकुमार बोरीकर तर आभार कवी सुरेंद्र इंगळे करतील. कविसंमेलनात सहभागी होण्याचे आवाहन गोंडपिंपरीचे सहाय्यक गटविकास अधिकारी तथा आयोजक धनंजय साळवे, विजय वाटेकर, धर्मेंद्र कन्नाके यांनी केले आहे. कविसंमेलनात सहभागी कविंच्या रचना शासन स्तरावर जनजागृतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांना फिनिक्स साहित्य मंचातर्फे सुपुर्द करण्यात येतील, असे कळविण्यात आले आहे.
कोरोना लसीकरण जागृतीसाठी कवी संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:28 AM