आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : बदामाचे बी समजून चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने लालपेठ येथील सूरज प्राथमिक विद्यालयातील ४० ते ४५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. दरम्यान, यातील २६ विद्यार्थ्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी शुुक्रवारी सकाळी सुट्टी दिली. तर उर्वरित विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयातील उपचारानंतर सुट्टी दिल्याचे समजते.लालपेठ कॉलरी परिसरात सूरज प्राथमिक विद्यालयात विद्यार्थी खेळत होते. दरम्यान, बदामाचे बी समजून ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी चंद्रज्योती बिया खाल्ल्या. काही वेळानंतर त्यांना उलटी सुरू झाले शिक्षकांमध्ये खळबळ उडाली. मुख्याध्यापक व शिक्षकांनी २६ विद्यार्थ्यांना दाखल केले. तर काहींना डॉ. पाझारे व डॉ. लोढीया यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते.
चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने ४५ विद्यार्थ्यांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 11:56 PM
बदामाचे बी समजून चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने लालपेठ येथील सूरज प्राथमिक विद्यालयातील ४० ते ४५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली.
ठळक मुद्देसूरज विद्यालयातील घटना : उपचारानंतर सर्वांना सुट्टी