लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कोठारी व परिसरातील अनेक गावांत किडणी चोर व लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरविली जात असून नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. चोरांच्या भितीने नागरिकांनी रात्री बाहेर एकटे फिरणे बंद केले. सोशल मीडियातून व्हिडिओ चित्रफित व मॅसेज वायरल करण्याच्या घटना वाढतच आहे़ त्यामुळे अशी अफवा निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून प्रतिबंध करण्यासाठी सोशल मिडियावर नजर ठेवली जात आहे, अशी माहिती कोठारीचे ठाणेदार संतोष अंबिके यांनी दिली़कोठारी पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक गावांतील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकाºयांची पोलीस ठाण्यात नुकतीच शांतता बैठक घेण्यात आली होती़ यावेळी आक्सापूर येथे लोकांनी पकडलेल्या तीन इसमांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले़ त्यांची सखोल चौकशी केली असता ते किन्नर असून चंद्रपूरातील रहिवाशी असल्याची माहिती पुढे आली़ उदरनिर्वाहासाठी परिसरात फिरत असतात. मात्र आक्सापूर येथील काही नागरिकांनी त्यांना संशयावरुन ताब्यात घेतले़ पाचगाव व कवडजई येथे नागरिकांनी पकडलेले व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातील असल्याचे आढळले. त्यामुळे अफवांच्या आधारावर अनोळखी इसमांना पकडून त्यांचेकडे संशयतेने बघितले जात आहे. संशयतीना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करावे़ मात्र त्यांना मारहाण करू नये़ असे प्रकार घडल्यास दोषींवर गुन्हा दाखल करू, अशी माहिती पोलिसांनी दिली़ मोबाईलच्या माध्यमातून जनतेमघ्ये संभ्रम निर्माण करून दहशत पसरवू नये़ कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारे व्हिडिओ, मोबाईल मॅसेज व्हायरल केल्यास सिद्ध झाल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्याद्वारे कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला़गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी़ अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठीजागरूक नागरिकांनी शंकाचे निरसन करून जनतेला समजावून सांगावे, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली़
अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 12:56 AM
कोठारी व परिसरातील अनेक गावांत किडणी चोर व लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा पसरविली जात असून नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. चोरांच्या भितीने नागरिकांनी रात्री बाहेर एकटे फिरणे बंद केले.
ठळक मुद्देबनावट व्हिडिओ प्रकरण : सोशल मीडियावर पोलिसांची नजर