शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पतीची हत्या होऊनही पोलिसांनी केले आत्महत्येत रुपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 5:00 AM

पोलिसांनी मारहाण झाल्यानंतर दादारावने विष प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी केवळ दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माझ्या पतीच्या मृतदेहावर गंभीर मारहाण केल्याच्या जखमा होत्या. जिवती पोलीस पोस्टमार्टम रिपोर्ट द्यायला तयार नाही, असाही आरोप सुजाता पतंगे या पीडित महिलेने केला आहे.

ठळक मुद्देमृताच्या पत्नीचा गंभीर आरोप। जिवती तालुक्यातील घटना, पुनर्तपासणी करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिवती तालुक्यातील मुकदमगुडा येथे आपला पती दादाराव नारायण पतंगे यांची गाव पाटलासह सहा जणांनी लाथाबुक्क्या, दगड व काठीने अमानुष मारहाण करून हत्या केली. त्यांच्याजवळ विषाची बाटली ठेवली. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असताना जिवती पोलिसांनी केवळ आरोपींच्या बचावासाठी हत्येचा गुन्हा दाखल केला नाही, असा गंभीर आरोप मृतकाची पत्नी सुजाता पतंगे यांनी चंद्रपूर प्रेस क्लब येथे शनिवारी पत्रकार परिषदेत केला.पोलिसांनी मारहाण झाल्यानंतर दादारावने विष प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी केवळ दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माझ्या पतीच्या मृतदेहावर गंभीर मारहाण केल्याच्या जखमा होत्या. जिवती पोलीस पोस्टमार्टम रिपोर्ट द्यायला तयार नाही, असाही आरोप सुजाता पतंगे या पीडित महिलेने केला आहे.पतीचा मुकदमगुडा येथील संतोष माधव पतंगे व सचिन माधव पतंगे यांच्यात दगड मारल्याच्या कारणावरून वाद झाला होता. यावरून संतोष व सचिन यांनी तेलंगणातील केरामेरी पोलिसात तक्रार केली. केरामेरी पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे पतीला मारहाण करून सोडून दिले. ४ फेब्रुवारी रोजी पती दादाराव मुकदमगुडा येथे गेले असता संतोष पतंगे (गाव पाटील), लिंबाजी पतंगे (सरपंच, तेलंगणा), सचीन पतंगे, प्रयागबाई पतंगे, सूर्यकला संतोष पतंगे व अष्टशिला लिंबाजी पतंगे यांनी काठी, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत नालीत पाडून जिवानिशी मारले. ही घटना दिनेश नागोराव पतंगे व आकाश उमाजी वाठोरे यांनी प्रत्यक्ष बघितली. त्यांच्या डोक्यावर, मानेवर, दंडावर व गुप्तांगावर गंभीर जखमा होत्या. तसेच कपडे फाटलेले व रक्ताने माखले होते. या घटनेची जिवती पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता कोणतीही शहानिशा न करता आपल्या पतीने विष घेऊन आत्महत्या केल्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी आपले खोटे बयाण लिहून त्यावर अंगठा घेतला आहे, असा गंभीर आरोपही पीडित महिला सुजाता पतंगे यांनी यावेळी केला. या घटनेचा तपास जिवती पोलिसांकडून काढून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी करण्याची मागणीही पीडिता सुजाता पतंगे यांनी यावेळी केली.मृतदेहावर अग्निसंस्कार नाहीदादाराव पतंगे यांची हत्या झाली असतानाही जिवती पोलीस आरोपींचा बचाव करीत आहे. माझ्यासह माझ्या तीन चिमुकल्या मुलांना न्याय देण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुन्हा तपास करावा, यासाठी पतीच्या मृतदेहावर अग्निसंस्कार न करता दफनविधी केला आहे, ही बाबही पीडिता सुजाता पतंगे यांनी यावेळी नमुद केली. 

टॅग्स :Murderखून