शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

दारू तस्करांच्या युक्त्यांपुढे पोलीस यंत्रणा हतबल

By admin | Published: July 14, 2015 1:29 AM

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील गल्लीबोळात अवैध दारूचे अक्षरश: पाट वाहत आहेत. जिल्ह्यात येणारी दारू

चंद्रपूर : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील गल्लीबोळात अवैध दारूचे अक्षरश: पाट वाहत आहेत. जिल्ह्यात येणारी दारू रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रयत्न करीत असली तरी पोलिसांचे हे प्रयत्न उधळून लावून तस्कर नाना युक्त्या करीत जिल्ह्यात दारूचा पुरवठा करीतच आहेत. दामदुपटीने विकल्या जाणाऱ्या या दारूमुळे सामान्य मद्यपी आर्थिकदृष्टया उद्ध्वस्त होत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातून दारू हद्दपार करण्यासाठी श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने केली. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीचा पाठपुरावा करीत दारूबंदीसाठी पुढाकार घेतला. त्यातून १ एप्रिलला दारूबंदी झाली खरी, पण आता दारूबंदी हा केवळ फार्स वाटावा इतकी बिकट परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. केवळ मुखबिराकडून मिळालेल्या माहितीवरच पोलिसांच्या कारवाया सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुखबिरांपासून सावध राहत दारू तस्कर छुप्या मार्गाने दारूची तस्करी करीत आहेत. गॅस सिलिंडर आणि महागडी वाहनेदारू तस्करीसाठी जे जे युक्त्या करता येतील, त्या तस्करांकडून केल्या जात आहे. दारूबंदीनंतर पोलिसांनी तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्ह्यातील मुख्य मार्गावर पोलीस चौक्या उभारल्या होत्या. या दरम्यान, गॅस सिलिंडरमधून दारूची तस्करी करणाऱ्या एका महाभागाला घुग्घूस पोलिसांनी अटक केली होती. त्याही पुढे जाऊन आता पोलिसांना संशय येऊ नये म्हणून जिल्ह्यात दारू आणण्यासाठी महागड्या वाहनांचा वापर केला जात आहे. सामान्यपणे महागड्या वाहनातून दारूची तस्करी होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे पोलिसांकडून अशा वाहनांची तपासणी केली जात नाही. मात्र जेव्हा चंद्रपूर शहरातील चोरखिडकी परिसरात काही महागड्या वाहनात देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या तेव्हा पोलिसांनी डोक्यावर हातच मारून घेतले. तस्करीसाठी वेशांतरकमी वेळात अधिक पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी अनेकजण अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात उतरले आहेत. मध्यंतरी चंद्रपूर शहर पोलिसांनी एका विधिज्ञाला अवैध दारू विकताना रंगेहात पकडले होते. त्यामुळे या धंद्यात प्रतिष्ठितांनीही उडी घेतल्याची बाब उजेडात आली. रविवारी तर घुग्घूसमध्ये एक धक्कादायक प्रकार उजेडात आला. घुग्घूस येथील रहिवासी रमेश पोचम चिरुगुला या २६ वर्षीय युवकाने दारूची तस्करी करण्यासाठी चक्क वेशांतर केले. अन्य दारू विक्रेत्या महिलांसोबत त्यानेही महिलेचा वेश परिधान केला. मात्र त्याची ही युक्ती कामी आली नाही. घुग्घूसच्या बसस्थानकावर पोलिसांनी त्याच्यासह अन्य तीन महिलांना अटक केली. १०० दिवसांत पावणेदोन कोटींची दारू जप्तदारूबंदीनंतर पोलिसांनी अवैध दारू विरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्यात. केवळ १०० दिवसांत एक कोटी ८५ लाख ४० हजार ४०७ रुपयांची दारू जप्त केली, तर अवैधरित्या दारूची तस्करी, विक्री करणाऱ्या दोन हजार आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले. अवैध दारू विक्री आणि तस्करी प्रकरणी एक हजार ८०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.