लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कर्तव्यावर असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांनी एका महिलेची अब्रु वाचविली. यावेळी त्यांना वीरमरण पत्कारावे लागले. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांना २२ वर्षानंतर सिद्धार्थ शाळेत आयोजित शहीदाचा दर्जा देण्यात आला असून याठिकाणी त्यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे.९ जून १९९६ रोजी पोलीस हवालदार साधुजी चांदेकर हे आपल्या दुचाकीने चंद्रपूरकडे जुनोना मार्गे जात होते. यावेळी त्यांना गिलबिली गावाजवळ एका ट्रकमध्ये महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. आवाजावरुन चांदेकर यांनी आपले वाहन थांबविले. यावेळी ट्रकमध्ये पाहिले असता, त्यांना ट्रक चालक चारा शोधण्यासाठी आलेल्या महिलेचा छळ करीत असताना दृष्ट्रीस पडले. यावेळी चांदेकर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, त्या महिलेची ट्रक चालकाच्या तावडीतून सुटका केली. दरम्यान तिला सुखरूप तिच्या मार्गावर सोडले.मात्र संतप्त झालेल्या ट्रकचालकाने साधुजी चांदेकर यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या त्यांच्या विरमरणाला शनिवारी राज्य आणि केंद्र शासनाने पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांना शहीदाचा दर्जा दिला. यावेळी त्यांच्या पत्नी अनीता चांदेकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) मारोती इंगवले, पोलीस निरिक्षक कोळी, पी. व्ही. मेश्राम उपस्थित होते.पोलीस कल्याण सप्ताहाचा समारोपचंद्रपूर : १ ते ८ जून २०१८ या कालावधीत पोलीस कल्याण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप शुक्रवारी पोलीस मुख्यालयात पार पडला. सदर सप्ताहादरम्यान पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता पोलीस कल्याण निधी अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजना व नवनवीन उपक्रमाची माहिती पुस्तिका, तसेच पोलीस कल्याण योजनामार्फंत विविध अनुदानाची माहितीची फलके वाटप करण्यात आली. शिबिरादरम्यान दररोज योग शिबिर, व्यक्तीमत्त्व विकास, व्यसन मुक्ती, मणी सेविंग्स, फिटनेस फंडा, रुग्णालय आणि डॉक्टर्स, वाहतूक नियमन आदीबाबत माहिती पोलिसांना देण्यात आली. तसेच पोलिसांना विविध विषयांवर वरिष्ठ आधिकाºयांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रम पोलीस मुख्यालय ड्रिल शेड येथे जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांचे मार्गदर्शनात पार पडला. समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक (गृह) मारोती इंगवले, पोलीस निरीक्षक अशोक कोळी, मानव संसाधन विकास चंद्रपूर आणि विविध पोलीस स्टेशन, शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:39 PM