शहरात वाहतुकीची कोंडी
चंद्रपूर : चंद्रपुरात मुख्य दोन रस्ते आहेत. या रस्त्यावर वाहने कुठेही पार्क केली जात असल्याने अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. येथील जेटपुरा गेट तसेच चोरखिडकी परिसरात नेहमी वाहनांची कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.
तीर्थक्षेत्रातील निवाऱ्याची दुरावस्था
चंद्रपूर : चंद्रपूर-आदिलाबाद राज्य महामार्गावरील तीर्थक्षेत्र असलेल्या गावाकडील रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना झाडांचा आश्रम घ्यावा लागत आहे. दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्लास्टिकचा वापरावर निर्बंध लावावा
चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. शहरातील गंजवॉर्ड, गोलबाजार, भिवापूर, सुपर मार्केट व अन्य बाजाराच्या ठिकाणी गरज नसतानाही प्लास्टिक पिशव्या देण्यात येतात. या पिशव्या कुठेही टाकून देण्यात येत असल्याने पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिक पिशव्या अनेकदा नाल्यांमधे साठून नाल्या तुंबतात. महानगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.