शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

सुगंधित तंबाखूच्या साठ्यावर पोलिसांचे धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 5:00 AM

चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने यापूर्वी काही कारवाया केल्या आहेत. आजच्या कारवायांमध्ये पोलीस प्रशासनासह अन्न व औषध विभाग आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे सुद्धा धावून गेले. या तिघांमध्ये स्पर्धाच लागली होती. लोकमतचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाने हा विषय गांभिर्याने घेत तीन ठिकाणी धाडी घालून सुंगधित तंबाखूचा अवैध साठा जप्त केला.

ठळक मुद्देतपास अन्न व औषध प्रशासनकडे : चंद्रपूर, पडोली, पोंभूर्णा व गडचांदुरात २० लाख ४०० रुपयांचा तंबाखू जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘लोकमत’ शुक्रवारी ग्राऊंड रिपोर्टच्या माध्यमातून ‘चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखूचा काळाबाजार तेजीत’ या आशयाच्या वृत्तातून सुगंधित तंबाखूच्या छुप्या मार्गाने होत असलेल्या विक्रीचा भंडाफोड केला. या वृत्ताने अन्न व औषध प्रशासन विभागासह पोलीस प्रशासनही खळबडून जागे झाले. स्थानिक गुन्हे शाखेने दिवसभरात सुगंधित तंबाखूच्या साठ्यावर धाडसत्र राबवून चंद्रपूर शहर, पडोली, पोंभूणा व गडचांदूर येथून तब्बल २० लाख ४०० रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठाच जप्त केला. या साठेबाजांवर यापुढे अन्न व औषध विभाग कारवाई करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी दिली.सुगंधित तंबाखूचा काळाबाजार होऊ नये, याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागावर आहे. या विभागात कर्तव्यावर असणाऱ्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना अशा काळाबाजारावर कार्यवाही करण्याचे अधिकार आहे.परतुं, चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने यापूर्वी काही कारवाया केल्या आहेत. आजच्या कारवायांमध्ये पोलीस प्रशासनासह अन्न व औषध विभाग आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे सुद्धा धावून गेले. या तिघांमध्ये स्पर्धाच लागली होती. लोकमतचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाने हा विषय गांभिर्याने घेत तीन ठिकाणी धाडी घालून सुंगधित तंबाखूचा अवैध साठा जप्त केला. यामध्ये पडोली येथे आरीफ हारूण कोलसावाला (४२) रा. अरविंदनगर मूल रोड चंद्रपूर याच्या मालकीचा तब्बल १५ लाख ३७ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेचे जप्त केला. याशिवाय भिवापूर वार्डातील सुपर मार्केट येथे नरेंद्र राघोबाजी दुपारे (५२) रा. भिवापूर वार्ड याच्याकडून ३० हजार ४०० रुपयांचा तर पोंभूर्णा येथील सचिन नानाजी लेकलवार यांच्याकडून ३३ हजार रुपयांचा सुंगधित तंबाखू जप्त केला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक गदाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोयर, पोेलीस हवालदार बुजाडे व काकडे यांनी केली.गडचांदूरात ४ लाखांचा तंबाखू जप्तगडचांदूर पोलिसांनी सावित्रीबाई फुले शाळेजवळील चौकात एमएच ३४ एए ४७८४ या क्रमांकाच्या कारमधूर ४ लाखांचा सुगंधित तंबाखू तप्त केला. यामध्ये इज्तियाज किडिया रा. गडचांदूर याच्यासह दोघांना अटक केली आहे. पुढील तपास अन्न व औषध प्रशासन विभाग करीत आहे.मोठ्या साठेबाजांना अभयसुगंधित तंबाखूचा अवैध व्यापार करणारे बडी मंडळींपर्यंत अद्यापही पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासन विभागाचे हात पोहचलेले नाही. ते पोहचणारही नाही, अशी चर्चा या कारवायानंतर सुरू झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आणखी सुगंधित तंबाखूचे मोठे साठे असून याची माहितीही संबंधित विभागाला आहे. मात्र त्यांच्यावर हात टाकणार नाही, अशीही चर्चा ऐकायला आली आहे.वरोºयातील ‘त्या’ कारवाईची साठेबाजाला पूर्वकल्पना पोलिसाकडूनच?वरोरा येथे काही दिवसांपूर्वी सुंगधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. सदर कारवाई करण्यासाठी पोलीस पथक येणार असल्याची पूर्वसूचना एका पोलिसानेच संबंधित तंबाखू साठेबाजाला दिली होती. यानंतर तंबाखूचा साठा इतरत्र हलविल्याची खळबळजनक माहिती विश्वसनीय सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. याची चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यताही सूत्राने वर्तविली.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी