चंद्रपूर : रोज डे निमित्त चंद्रपूर येथील जनता कॉलेज चौकात असलेल्या एका गेस्ट हाऊसवर गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर पोलिसांनी धाड टाकून महाविद्यालयीन 13 जोडप्यांना पकडले. चंद्रपूर आणि लगतच्या परिसरातील 13 मुले व 13 मुली यात सापडल्या आहेत.काही महाविद्यालयीन तरुण तरुणी रेणुका गेस्ट हाऊसमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी रेणुका गेस्ट हाऊसवर पाळत ठेऊन आज धाड घातली आणि 13 जोडप्यांना रंगेहात पकडलं. या गेस्ट हाऊसचा मालक फरार झाला असून नोकराला अटक करण्यात आली.
'रोज डे'ला पोलिसांनी कॉलेज चौकातल्या गेस्ट हाऊसवर धाड टाकली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 3:08 PM