प्रीतम दुर्गे
जिवती : जादूटोणा केल्याच्या संशयावरून महिला, वृद्धांना बांधून मारल्याची घटना जिवती तालुक्यातील वणी या गावात घडली होती. यात अनेक आरोपींना अटक केली असली तरी आणखी अनेक आरोपी फरार आहेत. पोलिसांनी त्यांची शोधपत्रिकाच काढली आहे.
हे प्रकरण सर्वप्रथम ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. पोलिसांनी दखल घेत आरोपींना अटक करायला सुरुवात केली आणि आता एकूण ४१ आरोपींना अटक झाली आहे. त्यांतील नऊ आरोपींना जामीन मिळाला असून ३२ आरोपी अजूनही चंद्रपूरला ठेवले आहेत. मारहाण करणारे काही आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध अजूनही सुरू आहे. आरोपीचे नाव कन्फर्म करीत आता पोलिसांनी शोधपत्रिका काढली आहे. व्यंकटी ऊर्फ तिरूपती बचीफळे (२५), रामेश्वर ऊर्फ बंडू सब्बूचे (२५), संध्या कांबळे (३२) व परमेश्वर कांबळे (३२) अशी फरार आरोपींची नावे पोलीस प्रशासनाने जाहीर केली आहेत.
250921\screenshot_20210925-172751~2.png
शोधपात्रिका.