शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

मद्यपींवर पोलिसी वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 12:13 AM

शुक्रवारी सर्वत्र उत्साहात धूळवड साजरी व्हावी, यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला असून दारू विक्रेते व मद्यपींवर पोलिसी वॉच असणार आहे.

ठळक मुद्देबेदरकार वाहनचालकांवर कारवाई : होळी साजरी करा; पण जपून

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : शुक्रवारी सर्वत्र उत्साहात धूळवड साजरी व्हावी, यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला असून दारू विक्रेते व मद्यपींवर पोलिसी वॉच असणार आहे. मद्य पिऊन बेदरकार वाहन चालविणाºयांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी लागू आहे. तरीही जिल्ह्यात अवैध मार्गाने दारू विक्री केली जाते. यावर अंकूश लावण्याचा पोलीस सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र दारू विक्रीवर आळा बसू शकला नाही. गुरुवारी आणि शुक्रवारी होळी व धूळवड असल्यामुळे या दिवसात दारू विक्रीलाही उधान आले असते. मात्र यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.रंगपंचमी या रंगाच्या उत्सवात अनुचित घटनेचे ग्रहण येऊ नये, यासाठी अवैध दारू विक्रेते व मद्यपींवरही विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. बेदरकारपणे अतिशय वेगात वाहन चालविणे, रॅश ड्रायव्हींग, ट्रिपल सीट, स्टंटबाजी करणे शुक्रवारी महागात पडणार आहे. कारण अशा वाहनचालकांना नियंत्रित करण्यासाठी शहरातील चौकाचौकात, रस्त्यावर पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहे.१३९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईहोळीत गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा उपद्रव होऊ नये, यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील एक हजार ३९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यात सीआरपीसी कलम १०७/११६ (३) अन्वये ५८४, कलम ११० अन्वये ७६, कलम ९३ दारूबंदी कायदा अन्वये १६८, सीआरपीसी कलम १४४ (३) अन्वये ४६६, कलम ९१ महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये २७, सीआरपीसी कलम १०९ अन्वये ४, कलम ५६ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये दोन, सीआरपीसी कलम १४९ अन्वये ४३ आणि सीआरपीसी कलम १५१ (३) अन्वये २२ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.अडीच कोटींचा मुद्देमाल ताब्यातहोळीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून जिल्हाभरातील पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे. यात अंतर्गत आतापर्यंत दोन कोटी ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ५२२ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.